खुशखबर! प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल 29 जुलैपर्यंत

वृत्तसंस्था
बुधवार, 24 जुलै 2019

खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होता यावे यासाठी 29 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती  कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली.

मुंबई : खरीप हंगाम 2019 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत राज्यातील सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग होता यावे यासाठी 29 जुलैपर्यंत योजनेस मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती  कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी आज दिली.

योजनेत सहभागी होण्यासाठी  बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे विमा अर्ज बँक व `आपले सरकार सेवा केंद्र` (डिजीटल सेवा केंद्र) येथे स्विकारण्यात येत आहेत. तरी शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत पीक विमा संरक्षण मिळण्यासाठी  विहित मुदतीपुर्वी नजिकची बँक व आपले सरकार सेवा केंद्रावर विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावा.

याबाबत अधिक माहितीसाठी विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी तसेच यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषिमंत्र्यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: time extended for prime minister crop insurance scheme till 29 july