घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ; आर्थिक गणित बिघडले; मजूर गावी गेल्याने खोल्या रिकाम्या

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 20 May 2020

नवी मुंबई शहरातील बहुतांश कामगार मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना कामगारांनी भाड्याच्या राहत्या खोल्या सोडल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. खोल्या भाड्याने देता याव्यात म्हणून घरमालक आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर अवलंबून असलेले इतर घटकांनाही आर्थिक चणचण भासत आहे

वाशी : नवी मुंबई शहरातील बहुतांश कामगार मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना कामगारांनी भाड्याच्या राहत्या खोल्या सोडल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. खोल्या भाड्याने देता याव्यात म्हणून घरमालक आर्थिक अडचणीत आले आहेत. यावर अवलंबून असलेले इतर घटकांनाही आर्थिक चणचण भासत आहे

पैसे नसतील तर आम्ही मरायचे का? कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांचा सवाल

नवी मुंबई शहर आणि परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये नोकऱ्या करणारे बहुतांश कामगार भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करतात. मासिक भाडे देऊन कामगार आपल्या कुटुंबासह खोली घेऊन राहतात. दहा ते पंधरा हजार रुपये अनामत रक्कम आणि तीन हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत घरभाडे आकारले जाते. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, जुईनगर, तुर्भे आदी परिसरात कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात. एमआयडीसीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांनी दुमजली घरे बांधली असून, खाली स्वत: राहून वरचे घर हे भाड्याने देऊन त्यामध्ये उदरनिर्वाह करण्यात येत होता. गावठाणमध्ये फिफ्टीफिफ्टीवर घर भाड्याने बांधकाम व्यावसायिकांकडून मिळण्यात आलेली घरे ही भाड्याने देऊन त्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आपला उदरनिर्वाह करत आहेत. आता एमआयडीसीतील कंपन्या तसेच कामे बंद असल्याने कामगारांनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. कारखाने सुरळीत होत नाहीत तोपर्यंत कामगारांनी पुन्हा गावाकडून परत न येण्याचा निर्णय घेतला आहे. परराज्यातील कामगार पुन्हा परत येतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई शहर आणि परिसरामध्ये खोल्या भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये वर्षांकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते.

अपयश झाकण्यासाठीच अधिकाऱ्यांचे बदलीसत्र : निरंजन डावखरे

भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कामगारांकडून तीन महिने भाडे वसूल करू नये, असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. त्यामुळे भाड्याच्या रकमेसाठी घरमालकांना कामगारांकडे तगादा लावता येणार नाही.
कोरोनाच्या धास्तीने कामगार आपल्या मूळ गावी गेल्यामुळे पंचवीस टक्केपेक्षा जास्त खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. अनेकांची उपजीविका भाड्याच्या खोल्यांवर आहे. काही घरमालकांना महिन्याला एक लाखांपर्यंत भाडे मिळत होते. ते आता मिळणार नाही, असे ऐरोली येथील रवि पाटील यांनी सांगितले. 

टाळेबंदीनंतर भाडेकरूंनी खोल्या रिकाम्या केल्या आहेत. गेल्या महिनाभरापासून खोल्या रिकाम्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यानंतर अजूनपर्यंत भाडेकरू मिळाले नाहीत. 
- नितीन माने, ऐरोली 

कोरोनाच्या धास्तीने परराज्यातील तसेच राज्यातील कामगार गावी परतले आहेत. त्यामुळे खोल्या रिकाम्या झाल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे आर्थिक गणित बिघडणार आहे.
- राकेश मोकाशी, दिघा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to find a tenant on the landlord; Rooms empty as laborers go to village