ठाण्यात  पाटीलकी

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिका निवडणुकीच्या १३१ जागांसाठी सुमारे ८०५ उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये उभे असून त्यापैकी ६८ उमेदवार हे पाटील आडनावाचे असल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या लोकसंख्येमध्ये पाटील आडनावाच्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्या खालोखाल भोईर आडनावाचे २२ उमेदवार रिंगणात असून, जाधव आडनावाचे २० उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 

शेख आणि खान यांची संख्या प्रत्येकी १७ आहे. कांबळे - १६, यादव १४, म्हात्रे १२ आणि शिंदे आडनाव असलले ११ उमेदवार निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. अन्य अडनावांची संख्या पाच ते सात, तर काही आडनावाचे एक-एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. ८०५ उमेदवारांपैकी कोणत्या आडनावाचे उमेदवार सर्वाधिक विजयी ठरणार ते २३ फेब्रुवारीच्या निवडणूक निकालातून स्पष्ट होईल; मात्र सध्या उमेदवारांमध्ये पाटीलकी मात्र जोरात सुरू आहे.

Web Title: TMC election