टीएमटीची रिक्षाला धडक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

टीएमटी बसचालकावर गुन्हा दाखल

ठाणे : भरधाव टीएमटी बसने रिक्षाला धडक दिल्याची घटना ठाण्यात घडली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून रिक्षाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी टीएमटी बसचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

वंदना बसस्थानक सर्कलजवळ वळणाच्या ठिकाणी भरधाव वेगाने येणाऱ्या टीएमटीने तीन पेट्रोलपंपाजवळ रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला; तसेच रिक्षाचे नुकसान झाले. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात टीएमटी चालकाविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालक बलभीम दादाराव मोरे (६०) हे आपली रिक्षा वळवत असताना भरधाव टीएमटीने वेगाने येत असलेल्या रिक्षास समोरून धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक बलभीम यांच्या डोक्‍याला गुडघ्याला पाठीमागे मानेच्या ठिकाणी दुखापत झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMT - Rickshaw accident