टोकावडे पोलिस ठाण्याला आयएसओ प्रमाणपत्र

नंदकिशोर मलबारी
मंगळवार, 12 जून 2018

सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या  टोकावडे पोलिस ठाण्याला आयएसओ प्रमाण पत्र मिळाल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी व या परिसरातील जनतेच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. ही किमया या ठिकाणी असलेले सह पोलीस निरीक्षक धनंजय मोरे व त्याच्या सहकार्यांची एक वर्षात करून दाखविली आहे.

सरळगांव (ठाणे) - मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या  टोकावडे पोलिस ठाण्याला आयएसओ प्रमाण पत्र मिळाल्याने पोलिस ठाण्यातील कर्मचारी व या परिसरातील जनतेच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. ही किमया या ठिकाणी असलेले सह पोलीस निरीक्षक धनंजय मोरे व त्याच्या सहकार्यांची एक वर्षात करून दाखविली आहे.

माळशेज घाटात वारंवार होणारे अपघात, या अगोदर होणारी लूटमार व माळसेज घाटात निर्माण होणारी कायदा सुव्यवस्था व्यवस्थीत राहावी या साठी 2007 मध्ये टोकावडे पोलिस ठाण्याची निर्मीती करण्यात आली. या पोलिस ठाण्याचा परिसर हा ग्रामीण भाग. मुरबाड तालुक्यातील टोकावडे पोलिस ठाण्याच्या हद्दीत 93 गावे व 47 ग्रामपंचायतींचा समावेश असून 46 हजार 426 इतकी लोकसंख्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत आहे. या सर्व गावांची कायदा व सुव्यवस्था टोकावडे पोलिस ठाण्यातून सांभाळली जाते.       

आयएसओ मानांकनासाठी आवश्यक असलेले गुन्हे, कायदा व सुव्यवस्था या बाबीवर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सह पोलिस निरीक्षक धनंजय पोरे, उपनिरीक्षक सागर चव्हाण, व पोलिस ठाण्यातील कर्मचा-यांनी वर्षभर सात्यत्याने काम केले आहे. पोलिस ठाण्यातील मुदतबाह्य रेकॉर्ड नष्ट करण्यात आला असून, आवश्यक रेकॉर्ड व्यवस्थीत जतन करून ठेवले आहे. सीआरपीसी 102  प्रमाणे फिर्यादींना गुन्ह्यात जप्त माल परत करून तसेच न्यायालयातून निकाल लागलेल्या केससच्या समस्या प्राप्त करून वर्षभरात 74 मुद्देमालाची निर्गंती करण्यात आली आहे. न्यायालयातून प्राप्त  होणारे समन्स, वॉरंटची 100 टक्के बजावणी करण्यात आली आहे. हे ठाणे पूर्णपणे संगणीकृत करण्यात आले आहे. 24 तास वाय फाय सुविधा आहे. तक्रार करणा-या तक्रारदारांच्या तक्रारीची दखल तत्परतेने घेतली जात असल्याने मागिल 1 वर्षात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. 

या पोलिस ठाण्याला आयएसओ प्रमाण पत्र मिळाल्या संदर्भात माहीती देताना सह पो. निरीक्षक पोरे म्हणाले, डॉ.महेश पाटील (पो.अधिक्षक ठाणे ग्रामीण), प्रशांत कदम (अपर पो.अधिक्षक ठाणे ग्रामीण), राजेंद्र मोरे (उपविभागीय पो. अधिकारी मुरबाड) यांच्या मार्गदर्शना खाली सातत्यपूर्ण कामगिरी मुळे या पोलिस ठाण्यास आयएसओ मानांकन व स्मार्ट पोलिस ठाण्याचे प्रमाण पत्र मिळाले आहे. 28 जून 2018 रोजी या ठाण्याचे ऑडीट होऊन स्मार्ट प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.

Web Title: Tocawade police station has an ISO certificate