आजची रात्र सर्वात मोठी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

...म्हणून सर्वात लहान दिवस
शुक्रवारी उत्तररात्री उत्तरायणारंभ आणि शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे हा दिवस वर्षभरातला सर्वात लहान दिवस ठरेल. या रात्रीनंतर मात्र दिवसाच्या कालावधीत वाढ होत जाणार आहे. 

ठाणे - उद्याच्या दिवसानंतर येणारी रात्र या वर्षातली सर्वात मोठी रात्र असणार आहे. शुक्रवारी (ता. २१) संध्याकाळी अस्त होणारा सूर्य तब्बल १३ तास तीन मिनिटांनंतर उगवणार आहे. पण तरीही ही रात्र सर्वात मोठ्या दिवसांपेक्षा (काही मिनिटांनी) छोटीच आहे. कारण यावर्षीचा सर्वात मोठा दिवस (२१ जून) होता; १३ तास १४ मिनिटांचा!

खगोल अभ्यासक, पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शुक्रवारी उत्तररात्री ३ वाजून ५२ मिनिटांनी सूर्य सायन मकर राशीत प्रवेश करीत असल्याने उत्तरायणारंभ आणि शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे हा दिवस वर्षभरातला सर्वात लहान दिवस ठरेल. या रात्रीनंतर मात्र दिवसाच्या कालावधीत वाढ होत जाणार आहे. दर वर्षी २१ मार्च आणि २३ सप्टेंबर या दिवशी सूर्य विषुववृत्तावर असल्यामुळे दिवस आणि रात्री समान कालावधीच्या असतात असेही ते म्हणाले. 

पूर्वी आपण चैत्र-वैशाख वसंत ऋतू, ज्येष्ठ-आषाढ ग्रीष्म ऋतू असे पाठ करीत होतो आणि तसे समजत होतो. परंतु ते चुकीचे आहे, असा खुलासाही त्यांनी या वेळी केला. ऋतू हे चंद्र महिन्यांप्रमाणे होत नसतात. ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात. सूर्य ज्या दिवशी सायन मीन राशीत (१८ फेब्रुवारी) प्रवेश करतो. त्यावेळी वसंत ऋतूचा प्रारंभ होतो. सायन वृषभ (२० एप्रिल) ग्रीष्म ऋतू, सायन कर्क (२१ जून) वर्षा ऋतू, सायन कन्या (२३ आगस्ट) शरद ऋतू, सायन वृश्‍चिक (२३ आक्‍टोबर) हेमंत ऋतू, सायन मकर (२१-२२ डिसेंबर) शिशिर ऋतूचा प्रारंभ होत असतो असे  त्यांनी सांगितले.

...म्हणून सर्वात लहान दिवस
शुक्रवारी उत्तररात्री उत्तरायणारंभ आणि शिशिर ऋतूचा प्रारंभ होत आहे. त्यामुळे हा दिवस वर्षभरातला सर्वात लहान दिवस ठरेल. या रात्रीनंतर मात्र दिवसाच्या कालावधीत वाढ होत जाणार आहे. 

Web Title: Today biggest night