खासगी तेजस एक्स्प्रेसचा आज शेवटचा दिवस; एक्स्प्रेस तात्पुरती बंद, IRCTCचे स्पष्टीकरण

खासगी तेजस एक्स्प्रेसचा आज शेवटचा दिवस; एक्स्प्रेस तात्पुरती बंद, IRCTCचे स्पष्टीकरण

मुंबई: कोरोना महामारीच्या लॉकडाऊन नंतर रेल्वे मंत्रालयांतर्गत इंडियन रेल्वे कंटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसिटीसी) 17 ऑक्टोबरपासून खासगी तेजस एक्स्प्रेस सुरू केली होती. लखनऊ- नवी दिल्ली आणि मुंबई - अहमदाबाद मार्गावर ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. मात्र, जादा भाडे आकारत असल्याने प्रवाशांनी पाठ फिरवल्याने अखेर दोन्ही मार्गावर गाड्यांचा मंगळवार शेवटचा दिवस ठरला आहे.

लॉकडाऊन पूर्वी नव्याने सुरू झालेल्या तेजस एक्सप्रेसला प्रवाशांनी भरभरून प्रतिसाद मिळाला होता. मात्र, कोरोनाच्या महामारीनंतर तेजस एक्सप्रेसला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाला, निव्वळ 25 टक्केच प्रवासी मिळत असल्याने खासगी तेजस एक्सप्रेच्या उत्पन्नात प्रचंड घट झाली होती. दरम्यान उत्पन्न आणि प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी सवलतीच्या दरात पर्यटनाच्या योजना सुद्धा आयआरसीटीसीने आखल्या होत्या.

मात्र, सर्वसामान्य प्रवाशांसाठी अत्यंत महागडा प्रवास होत असल्याने प्रवाशांनी खासगी तेजस एक्सप्रेसला नाकारले, त्यानंतर रेल्वे मंत्रालयाने या खासगी तेजस एक्स्प्रेस तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 82510/02 लखनऊ-दिल्ली-लखनऊ तेजस एक्सप्रेस ट्रेन सोमवारी बंद करण्यात आली तर 242901/02 मुंबई - अहमदाबाद - मुंबई ही ट्रेन मंगळवारी रोजी बंद करण्यात येणार आहे. दरम्यान डिसेंबर महिन्यात पुन्हा या सेवा सुरू करण्यासाठी अभ्यास करणार असल्याचे आयआरसीटीसीने सांगितले आहे.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Today last day private Tejas Express temporarily closed IRCTC explanation

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com