मुंबईत  रेल्वेचा मेगाब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

उपनगरी रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. 15) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान डागडुजीची कामे करण्यात येतील. 

मुंबई - उपनगरी रेल्वेवरील रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी रविवारी (ता. 15) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर कल्याण ते ठाणेदरम्यान सीएसएमटीच्या दिशेने धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वाशी-पनवेलदरम्यान डागडुजीची कामे करण्यात येतील. 

मध्य रेल्वे 
कुठे : कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान "अप' धीम्या मार्गावर. 
कधी : सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत. 
परिणाम : या स्थानकांदरम्यान "अप' धीम्या लोकल जलद मार्गावर. लोकल, मेल, एक्‍स्प्रेस गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने. 

हार्बर मार्ग 
कुठे : वाशी ते पनवेल आणि माहीम ते गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' मार्गांवर. 
कधी : सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. 
परिणाम : सीएसएमटी-बेलापूर/पनवेल मार्गावरील दोन्ही दिशांकडील लोकल बंद. सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत ठाणे-पनवेल/बेलापूर "अप' व "डाऊन' ट्रान्सहार्बर लोकल बंद. सकाळी 10.45 ते दुपारी 4.01 वाजेपर्यंत सीएसएमटी-वांद्रे/गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' लोकल बंद. पनवेल-अंधेरी लोकल सेवाही बंद. सीएसएमटी ते वाशी आणि ठाणे-नेरूळ/वाशी विशेष लोकल. 

पश्‍चिम रेल्वे 
माहीम ते गोरेगाव स्थानकांदरम्यान "अप' व "डाऊन' मार्गांवर ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चर्चगेट ते गोरेगाव स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद राहील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: today megablock of the railway in Mumbai