शेतकऱ्यांसाठी आज मनसेचे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनांना शहरात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे आंदोलन केले जाणार असून, ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. 17) पहिले आंदोलन केले जाणार आहे. 

मुंबई - खळखट्ट्याक करणारा पक्ष म्हणून ओळख असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनांना शहरात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे आंदोलन केले जाणार असून, ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. 17) पहिले आंदोलन केले जाणार आहे. 

शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला शहरात चांगला भाव मिळत असल्याने सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कार्यालयांमध्ये त्यांना जागा मिळवून देण्यासाठी मनसे हे आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी ठाण्यातील गावदेवी मैदानापासून महानगरपालिकेवर मनसेतर्फे शेतकऱ्यांचा मोर्चा काढला जाणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे, की एकट्याने किंवा सामूहिकपणे उत्पादित केलेला माल विकण्यासाठी शेतकऱ्यांना साह्य करणे आवश्‍यक आहे. यामुळे काही शेतकऱ्यांना तरी दिलासा मिळेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Today MNS agitation for farmers