ठाणे जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार!..मृतांच्या संख्येनं शतक केलं पार..तर आज तब्बल 'इतक्या' नवीन रुग्णांची नोंद..  

corona
corona

मुंबई: मुंबईसह आसपासच्या इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होती चालला आहे. दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनात आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. 

 जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या आकडेवारीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर आज देखील जिल्ह्यात तब्बल २३४ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तर ९ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातला कोरोना बाधितांचा आकडा ४ हजार ४०३ वर तर मृतांचा आकडा तब्बल १३८ वर पोहोचला आहे. 

ठाणे महानगर पालिका क्षेत्रात बुधवारी नव्या कोरोना बधितांच्या संख्येनं शतक पार केलंय. नवी मुंबई महापालिकेत मात्र रुग्णांच्या आकडेवारीत घट बघायला मिळाली आहे. 
 
ठाणे शहरात सर्वाधिक ११० कोरोना बाधीतांची नोंद झाल्यामुळे कोरोना बाधितांचा आकडा १ हजार ४६३ वर पोहोचला आहे. तर नवी मुंबईत ४३ कोरोना बाधितांच्या नोंदीसह सर्वाधिक ६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा १ हजार ३६४ इतका झाला असून मृतांचा आकडा ४५ वर गेला.  

कुठे किती रुग्ण: 

कल्याण -डोंबिवलीत २६ नव्या बाधीतांसह तिघांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांचा आकडा ५९४ इतका तर मृतांचा आकडा १५ झाला आहे. उल्हानगरमध्ये ६ नवे रूग्ण आढळल्यामुळे बाधीतांचा आकडा १४४ झाला आहे. तसंच मीरा-भाईंदरमध्ये १४ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याने बाधितांचा आकडा ३८१ झाला आहे. भिवंडी महापालिका क्षेत्रात २३ नव्या रुग्णांमुळे बाधितांचा आकडा ७७ झाला आहे. बदलापूरमध्ये ५ रुग्णांची नोंद करण्यात आल्याने तेथील बाधितांचा आकडा १२४ झाला आहे. तसेच अंबरनाथमध्ये १ नवीन रूग्ण आढळला असून तेथील रूग्ण संख्या ४७ झाली आहे. तसंच ठाणे ग्रामीण भागात ६ नव्या बाधितांची नोंद झाल्याने बाधितांचा आकडा २१० झाला आहे. 

today new 234 corona patients found in thane district read full story

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com