लोणावळ्यातील शाळांना पुस्तके भेट
sakal media

लोणावळ्यातील शाळांना पुस्तके भेट

लोणावळा, ता. ६: वाचनवेड संस्था (पुणे) व अभंग प्रतिष्ठान (देहू) यांच्यावतीने लोणावळा परिसरातील ३७ जिल्हा परिषद शाळांना अवांतर वाचनाची पुस्तके भेट दिली. कुसगाव, वेहेरगाव व भाजे केंद्रातील सर्व शाळांचा यात समावेश आहे. मुलांना पाठ्यपुस्तके मिळतात. मात्र, अवांतर वाचनासाठी वाचन साहित्य उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला.

भाजे येथील संपर्क बालग्राम येथे झालेल्या कार्यक्रमप्रसंगी पुणे महानगर नियोजन समितीचे सदस्य संतोष भेगडे, गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे, अभंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, शिक्षण विस्तार अधिकारी राजश्री सटवे, शालिनी ढवळे, सचिन कुंभार, प्रा. विकास कंद, अजिंक्य साकोरे, सलीम मुलानी, सुहास विटे, मुकुंद तनपुरे, सुखदेव पथवे, साजन दळवी, नरेंद्र सहाय उपस्थित होते. वाचनवेड संस्थेचे प्रमुख किरीट मोरे, मयूर सेठ यांच्या सहकार्यातून सदर पुस्तके सर्व शाळांसाठी उपलब्ध करून दिली.

मुकुंद तनपुरे यांनी प्रास्ताविक केले. उमेश माळी यांनी सूत्रसंचालन केले. अतुल वाघ यांनी आभार मानले.


छायाचित्र: LON22B01617
भाजे: वाचनवेड संस्था व अभंग प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची पुस्तके देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com