
कायदेशीर घटस्फोट नसल्यास पतीच्या निवृत्तीवेतनाचा लाभ नाही - मुंबई हायकोर्ट
मुंबई : पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट (Legal Divorce) झाला नसेल तर दुसऱ्या पत्नीला मृत पतीच्या निवृत्ती वेतनाचा (Gratuity) लाभ मिळू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) एका प्रकरणात दिला आहे. न्या. एस. जे. काथावाला आणि न्या. मिलिंद जाधव यांच्या खंडपीठापुढे यावर नुकतीच सुनावणी झाली. सोलापूर जिल्हा कार्यालयात महिलेचा पती सेवेत होता. त्यांनी याचिकादार (Petitioner) महिलेशी दुसरा विवाह केला होता.
हेही वाचा: ठाणे : चिखलाने रोखला मुंबई-नाशिक महामार्ग
त्यांचे १९९६ मध्ये निधन झाले. त्यापूर्वी त्यांनी आणि त्यांच्या पहिल्या पत्नीने करार केला होता. पतीची नव्वद टक्के मालमत्ता पहिली पत्नी घेणार आणि निवृत्ती वेतनाचा ताबा दुसरी पत्नी घेणार, असे नमूद होते. मात्र पहिली पत्नी कर्करोगाने मृत्यू पावली. तीन मुले असल्यामुळे निवृत्ती वेतनाचा हक्क द्यावा, असे दुसऱ्या पत्नीने राज्य सरकारकडे अर्ज केला. मात्र याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
सर्वोच्च न्यायालयाने अनेक निकालात हिंदू विवाह कायद्यात पहिल्या लग्नाचा घटस्फोट कायदेशीर पद्धतीने झाला नसेल तर दुसरे लग्न वैध ठरू शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने पेन्शन न देण्याचा निर्णय योग्य आहे, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदविले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..