छत्रपती शिवाजी विद्यालय वावोशीच्या 1984 मधल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.

छत्रपती शिवाजी विद्यालय वावोशीच्या 1984 मधल्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन संपन्न.

माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन खोपोली, ता.5 (बातमीदार) ः कधीकाळी शिक्षण घेण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या विद्यार्थ्यांनी 37 वर्षानंतर स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. विद्यार्थीदशेत निर्माण झालेली भावनात्मक बांधिलकी जपत आपल्या तत्कालीन शिक्षक, शिक्षका आणि मित्रांसमवेत एकत्र येऊन मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी विद्यालय, वावोशीमध्ये १९८४ यावर्षी पास आउट झालेल्या दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र आपला स्नेह द्विगुणित केला. वावोशी जवळच्या आपटी गावातल्या राजेंद्र पाटील यांच्या फार्महाऊसवर या स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. यानिमित्ताने खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी आणि खालापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक अनिल विभुते यांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश कराड अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, निवृत्त शिक्षक एस के पाटील आणि एम डी पाटील आणि निवृत्त शिक्षिका प्रमिला पवार, रंजना पाटील इत्यादी मान्यवर निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित होते. आजवर आपण पोलिस दलात कामगिरी बजावत असताना क्राईम डिटेक्शनमध्ये फक्त गुन्हेगारांशी संवाद साधत आलो. मात्र, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सज्जन लोकांच्या समवेत हितगुज करण्याची संधी मिळाल्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com