धारावीतील चामड्याच्या वस्तूंचा सीएसएमटीत प्रसार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धारावीतील चामड्याच्या वस्तूंचा सीएसएमटीत प्रसार
धारावीतील चामड्याच्या वस्तूंचा सीएसएमटीत प्रसार

धारावीतील चामड्याच्या वस्तूंचा सीएसएमटीत प्रसार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : रेल्वे स्थानकांमध्ये स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्यासाठी आणि त्यांच्या विक्रीतून रोजगार निर्माण करण्यासाठी आत्मनिर्भर भारत आणि स्थानिक कार्यक्रमांअंतर्गत पावले उचलली जात आहेत. याच अनुषंगाने देशभरातील रेल्वे स्थानकांवर भारतीय बनावटीच्या वस्तू, उत्पादने विक्री करण्यास सुरुवात झाली आहे. यात आता धारावीतील प्रसिद्ध चामड्याच्या उत्पादनांचीही विक्री होत असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे शनिवारपासून (ता. ९) प्रदर्शन सुरू करण्यात आले. या ठिकाणी पर्स, पाकीट, बॅगच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
स्थानिक कारागीर, कुंभार, वीणकर/हातमाग वीणकर, आदिवासी यांच्या उपजीविकेच्या अनुषंगाने ‘एक स्थानक एक उत्पादन’ असे धोरण या वर्षी केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आले. ‘एक स्थानक एक उत्पादन’ ही संकल्पना म्हणून भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर स्थानिक उत्पादनाचा प्रचार करणे, हे त्या भागातील रेल्वे स्थानक उत्पादनाचे प्रचार आणि विक्री केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गतच रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत मध्य रेल्वेने पाच विभागांमध्ये प्रत्येकी एका स्थानकांवर ‘एक स्टेशन एक उत्पादन सुरू केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘एक स्थानक एक उत्पादन’ संकल्पनेतून धारावीतील चामड्याच्या उत्पादनांचे स्टॉल लावण्यात आले असून, त्याद्वारे वस्तूंचे प्रदर्शन, प्रचार आणि विक्री होत आहे. त्याचप्रमाणे पुणे विभागातील कोल्हापूर स्थानकात कोल्हापुरी चप्पल, भुसावळ विभागातील बुरहानपूर स्थानकात बुरहानपूरच्या स्थानिक हस्तकला, ​​सोलापूर स्थानकात सोलापुरी चादर (वस्त्र) आणि नागपूर स्थानकात बांबू उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत. ‘एक स्थानक एक उत्पादन’ अंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची योजना सुरुवातीला १५ दिवसांसाठी ठेवली जाणार आहे.

१५ दिवसांची मुदतवाढ
१) देशांतर्गत उद्योगांना बळकटी देण्यासाठी आणि भारताला स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशाने आत्मनिर्भार भारत अभियानांतर्गत ‘एक स्थानक एक उत्पादन’ ही संकल्पना आखण्यात आली. यात स्थानिक कारागिरांची उत्पादने आणि हस्तकला यांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे स्थानकांवर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
२) २५ मार्चपासून १५ दिवसांसाठी ‘एक स्थानक एक उत्पादन’चा हा उपक्रम देशातील १६ रेल्वे स्थानकांवर सुरू करण्यात आला. यात नागपूरमध्ये सर्वांत प्रथम प्रदर्शन भरवण्यात आले. आता या ठिकाणी प्रदर्शनाला आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top