booster dose
booster doseSakal

मुंबईत पहिल्या दिवशी २० टक्क्यांना कोविडचा प्रिकॉशनरी डोस

मुंबईत सोमवारी कोविड-१९ ची लस घेतलेल्या १८ ते ५९ या वयोगटातील एकूण १६,६६५ पैकी अंदाजे २० टक्के (३,११७) नागरिकांनी त्यांचा तिसरा किंवा प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस घेतला.
Summary

मुंबईत सोमवारी कोविड-१९ ची लस घेतलेल्या १८ ते ५९ या वयोगटातील एकूण १६,६६५ पैकी अंदाजे २० टक्के (३,११७) नागरिकांनी त्यांचा तिसरा किंवा प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस घेतला.

मुंबई - मुंबईत (Mumbai) सोमवारी कोविड-१९ ची लस (Covid Vaccination) घेतलेल्या १८ ते ५९ या वयोगटातील एकूण १६,६६५ पैकी अंदाजे २० टक्के (३,११७) नागरिकांनी त्यांचा तिसरा किंवा प्रिकॉशनरी (बूस्टर) डोस (Precautionary Dose) घेतला.

पालिकेच्या दैनंदिन लसीकरण अहवालातून असे दिसून आले की जवळपास निम्मे लाभार्थी (७,९९६) बूस्टर डोससाठी आले होते. बूस्टर डोस जानेवारीमध्ये ज्येष्ठ नागरिक, आरोग्यसेवा आणि फ्रंटलाईन कामगारांना उपलब्ध करून देण्यात आला होता. केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात जाहीर केले की १८-५९ वयोगटातील प्रौढदेखील बूस्टर डोस घेऊ शकतात. दरम्यान, ते कोव्हॅक्सिन किंवा कोविशिल्डसाठी अंदाजे ३८६ रुपये मोजून केवळ खासगी रुग्णालयांमध्ये बूस्टर डोस घेऊ शकतात.

पालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, मुंबईतील १२५ पैकी १५ खासगी लसीकरण केंद्रे १८-५९ वयोगटासाठी बूस्टर डोस देण्यासाठी सक्रिय करण्यात आली आहेत. याविषयी पालिका अधिकारी आणि रुग्णालय प्रशासन म्हणाले की, पुढील काही दिवसांत बूस्टर डोससंदर्भातील संख्या सुधारली पाहिजे.

लशींची मागणी दुप्पट

कोकिलाबेन रुग्णालयाचे सीईओ संतोष शेट्टी यांनी सांगितले की, बहुतेक दिवसांत ३०-३५ जणांच्या तुलनेत सोमवारी ९० जण लसीकरणासाठी आले. जे नागरिक लशीसाठी आले त्यापैकी निम्मे १८-५९ वयोगटातील होते, ज्यांना बूस्टर डोस हवा होता. लशींचा साठा कालबाह्य झाल्यावर पैशांचे नुकसान झालेली खासगी रुग्णालये बूस्टर ड्राईव्हसाठी डोस खरेदी करण्याबाबत सावध आहेत. फक्त ज्यांना परदेशात जायचे आहे तेच बूस्टर घेत आहेत, असेही डॉक्टर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com