सीईटीचे सुधारित वेळापत्रक जारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीईटीचे सुधारित वेळापत्रक जारी
सीईटीचे सुधारित वेळापत्रक जारी

सीईटीचे सुधारित वेळापत्रक जारी

sakal_logo
By

मुंबई, ता. २१ : आगामी जून महिन्यात देशभरात जेईई मुख्य परीक्षा होत असल्याने राज्य सीईटी सेलने आयोजित केलेल्या वैद्यकीय आणि अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबाबतची माहिती आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
जूनमध्ये होणाऱ्या राज्य सीईटी सेलच्या सर्व परीक्षा आता ऑगस्टमध्ये होणार आहेत. त्यासाठी सुधारित वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. अभियांत्रिकीची सीईटी ५ ते १० ऑगस्ट, तर वैद्यकीयची सीईटी ११ ते १८ ऑगस्टदरम्यान होणार आहे.
जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन जून आणि जुलैमध्ये करण्यात आले आहे. जेईई मेन परीक्षेचे पहिले सत्र २९ जून, तर दुसरे सत्र ३० जुलै रोजी संपणार आहे, तर नीट परीक्षा १७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. दरम्यान, राज्यात सीईटी परीक्षा ११ ते १६ जून या कालावधीत घेण्याचे नियोजन करण्यात आले होते; जेईई व नीट परीक्षांमुळे वेळापत्रकात बदल करण्याची मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर सीईटी सेलने हे नवीन वेळापत्रक जाहीर केल्याची माहिती सीईटी सेलचे आयुक्त रवींद्र जगताप यांनी दिली.
--------
सीईटी परीक्षांच्या सुधारित तारखा
अभियांत्रिकी - ५ ते १० ऑगस्ट
वैद्यकीय - ११ ते १८ ऑगस्ट
एमबीए, एमएमएस - २४ ते २६ जून
एमसीए - २७ जून
बी.एचएमसीटी - २८ जून
एम.एचएमसीटी - २८ जून
एम.आर्च - २८ जून
बी.प्लानिंग - ४ ऑगस्ट
बीए आणि बीएसस्सी बीएड - ३ जून
बीपीएड - ३ जून
विधी ३ वर्षे - ४ जून
बीएड - ६, ७ जून
बीएड, एमएड - ९ जून
एमएड - ९ जून
एमपीएड - १० जून
विधी (५ वर्षे) - १८, १९ जून
दृष्यकला पदवी व डिझाईन - १२ जून

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top