
मुंबई ते मऊसाठी उन्हाळी विशेष एक्स्प्रेस
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीकालीन प्रवाशांची अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी एलटीटी ते मऊदरम्यान विशेष शुल्कासह २० अतिजलद साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०५१ अतिजलद साप्ताहिक विशेष एलटीटी येथून २८ एप्रिल ते ३० जून दरम्यान दर गुरुवारी पहाटे ५.१५ वाजता सुटेल. ही गाडी मऊ येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०५२ अतिजलद साप्ताहिक विशेष मऊ येथून ३० एप्रिल ते २ जुलैदरम्यान दर शनिवारी पहाटे ५.४५ वाजता सुटेल. ती एलटीटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता पोहोचेल. या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती स्टेशन, बिना, वीरांगणा लक्ष्मीबाई स्टेशन, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज, ग्यानपूर, बनारस आणि वाराणसी या स्थानकांवर थांबेल. एक प्रथम वातानुकूलित, दोन द्वितीय वातानुकूलित, चार तृतीय वातानुकूलित, दहा शयनयान आणि गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी अशी गाडीची संरचना असणार आहे. या गाडीचे विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक ०१०५१ चे बुकिंग २४ एप्रिलपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..