टोळ आंबेत मार्गावरील टोळ पूल एक महिना बंद

टोळ आंबेत मार्गावरील टोळ पूल एक महिना बंद

महाड : मुंबई-गोवा महामार्गाला जोडणारा वीर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्त्यावरील टोळ पूल देखभाल-दुरुस्तीसाठी १० जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२२ या कालावधीत बंद राहील. रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी हे आदेश जारी केले आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांचे बळी गेले होते. त्यानंतर सरकारने राज्यातील सर्व मोठ्या पुलांच्या स्थापत्यविषयक परीक्षणाचा निर्णय घेतला होता. त्यात टोळ पूल वाहतुकीला धोकादायक असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्यानुसार या पुलाच्या दुरुस्तीचे काम महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.

टोळ आंबेत मार्गावरील टोळ पूल एक महिना बंद
संपादकीय : कझाकस्तानातील उद्रेकाचा अर्थ

महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रातील वीर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्त्यावरील माणगाव येथून वाहत येणाऱ्या काळ नदीवर टोळ गावानजीक बांधलेला हा पूल एकूण १५७ मीटर लांबीचा मोठा पूल आहे. हा पूल कमकुवत झाल्याने अधीक्षक अभियंता, संकल्प चित्र मंडळ (पूल) यांनी सुचविल्याप्रमाणे पुलाच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड कार्यालयाकडून कार्यारंभ आदेश मे. डायनासोर काँक्रीट ट्रीटमेंट प्रा.लि.यांना देण्यात आले आहेत. या पुलाच्या दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करण्यात येणार आहे. ... लोणेरेमार्गे म्हाप्रळ-आंबेत-पुरार मार्गे पुलाचे सांधे बदलणे तसेच ‘पेडस्टल’ची दुरुस्तीची गरज आहे. पुलाच्या तुळईसहित स्लॅब उचलणे, एक्स्पन्शन सांधे बदलण्यासाठी हा पूल महिनाभरासाठी बंद ठेवला जाणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरून दापोली मंडणगडकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग म्हणून या पुलाचा अधिक वापर होतो. पूल बंद कालावधीत दापोली, मंडणगड, श्रीवर्धन येथे जाण्यासाठी पर्यायी वाहतूक लोणेरेमार्गे म्हाप्रळ-आंबेत-पुरार मार्गे करणे सोयीचे होणार आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com