महाड येथीप अमिना कॉम्प्लेक्स धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाड येथीप अमिना कॉम्प्लेक्स  धोकादायक
महाड येथीप अमिना कॉम्प्लेक्स धोकादायक

महाड येथीप अमिना कॉम्प्लेक्स धोकादायक

sakal_logo
By

महाड, ता. ३० (बातमीदार) : शहरातील अमिना कॉम्प्लेक्स ही इमारत स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक सिद्ध झाल्याने ती तात्काळ रिकामी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

शहरातील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत ऑगस्ट २०२० मध्ये कोसळली होती. या दुर्घटनेत १६ जणांना प्राण गमवावे लागले. यानंतरच शहरातील अनेक धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. शहरातील अमिना या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या स्थापत्य विभागाच्या पथकाने केले. त्यामुध्ये ही इमारत अतिधोकादायक असून इमारतीमधील नागरिकांनी इमारत तात्काळ ती रिकामी करण्याचा सल्ला देण्यात आला.
तारिक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर पालिका प्रशासनाने शहरातील सुमारे तीनशे इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. यामध्ये ४० इमारतींची दुरुस्ती करण्यात आली; तर ३३ रहिवाशांनी सदनिका खाली केल्या आहेत. यातच शहरातील एसटी स्थानक परिसरातील अमिना कॉम्प्लेक्सची तक्रार रहिवाशांनी केली होती.
अमिना कॉम्प्लेक्समधील १२ रहिवाशांनी प्रथम सोलकर यांच्याकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. यामध्ये अतिधोकादायक असा अहवाल आल्याने इमारतीमधील सहा रहिवाशांनी दुसऱ्या संस्थेमार्फत स्ट्रक्चरल ऑडिट केले. यामध्ये ही इमारत साधारण धोकादायक असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. यामुळे या सहा रहिवाशांनी महाड नगरपालिकेतर्फे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी करून ऑडिटचे एक लाख रुपये फीदेखील भरली. त्यानुसार अखेर महाड पालिकेने सरकारी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठामधील पथकाला पाचारण केले. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पोलिस बंदोबस्तात नमुने गोळा केले होते. त्याचा अहवाल धोकादायक असा आला आहे. याबाबत महाड नगरपालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना नोटीस पाठवून इमारत खाली करण्याबाबत कळवले जाणार आहे.
...
अमिना कॉम्प्लेक्स या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट प्राप्त झाले असून सदर इमारतीच्या अहवालानुसार पालिका प्रशासन याबाबत तात्काळ पावले उचलत आहे. रहिवाशांनीदेखील इमारत खाली करावी.
- महादेव रोडगे, मुख्याधिकारी, महाड पालिका
....
अमिना कॉम्प्लेक्स इमारतीमधील रहिवाशांनी केलेल्या मागणीनुसार या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यानुसार ही इमारत धोकादायक असून लवकरच इमारतीमधील रहिवाशांना नोटीस देण्यात येईल.
- सुहास कांबळे, बांधकाम अभियंता, महाड पालिका
...
गेल्या वर्षभरापासून आम्ही इमारत खाली करून बाहेर राहत आहोत. धोकादायक अहवाल असूनदेखील इमारत बांधकाम करणारा दाद देत नाही. यामुळे आम्हाला पालिकेने न्याय देणे आवश्‍यक आहे.
- अब्दुल हकीम अब्दुल रज्जाक, रहिवासी

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..