महाड येथे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाड येथे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक
महाड येथे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक

महाड येथे नागरी संरक्षण दलाचे स्वयंसेवक

sakal_logo
By

महाड, ता.२३ (बातमीदार) : दरडग्रस्त व पूरग्रस्त तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाड तालुक्यात संकट काळात नागरिकांना त्वरित मदत करण्यासाठी प्रत्येक महसूल मंडळामध्ये नागरी संरक्षण दलामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

महाड तालुक्यात सातत्याने पूर येत असतात. दरड कोसळून जीवितहानी होण्याचे प्रमाणही येथे मोठे आहे. याचा विचार करून महाडमध्ये नागरिकांना प्रशिक्षणाची आवश्‍यकता असल्याने महाड तालुक्यातील दरडग्रस्त गावे व पूरग्रस्त गावे येथील नागरिकांकरिता प्रत्येक मंडळात पाच दिवसीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. प्रत्येकाला हे पाच दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ओळखपत्र व प्रशिक्षण भत्ताही दिला जाणार आहे.
...........
महाडमध्ये वारंवार आपत्ती येतात. यामुळे नागरी संरक्षण दलाचे प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. दरडग्रस्त गावे आणि पूरग्रस्त गावांतील नागरिकांनी यामध्ये सहभाग घ्यावा.
- सुरेश काशिद, तहसीलदार, महाड.
...........

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top