
चोरट्याने चोरला चक्क डंपर
महाड, ता. २४ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळील राजेवाडी फाटा येथे एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभा असणारा टाटा कंपनीचा आयवा डम्पर चोरट्याने चोरून नेला आहे. २३ एप्रिलला पहाटे साडेतीन ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान ही घटना घडली. याबाबत डम्परमालक ओमकार बुचडे (वय २६, राहणार मुळशी, तालुका पुणे) यांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. ओमकार यांचा बिल्डिंग मटेरियल पुरवण्याचा व्यवसाय असून त्यांनी आपला आयवा डम्पर राजेवाडी फाटा येथील यादगार हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभा करून ठेवलेला होता. २३ एप्रिलला सायंकाळी सदरचा डम्पर पार्किंगमध्ये नसल्याचे त्यांच्या निदर्शनास येतात त्यांनी याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या डम्परची किंमत बारा लाख रुपये असून याप्रकरणी अधिक तपास हवालदार अष्टमकर हे करत आहेत.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..