बुवा-बाबांचा भांडाफोड करणार

बुवा-बाबांचा भांडाफोड करणार

अंनिस बुवा-बाबांचा भांडाफोड करणार रायगड जिल्हा शाखेच्या बैठकीत निर्णय पाली, ता. ९ (वार्ताहर) : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रायगड जिल्हा शाखेची बैठक शनिवारी (ता. ८) पालीत झाली. या वेळी बुवा-बाबांचे पितळ उघडे करण्याचा निश्‍चय करण्यात आला. बैठकीत ॲड. मुक्ता दाभोळकर यांच्या जिल्हा दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. त्याचबरोबर संघटनेच्या आगामी उपक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली. जिल्ह्यात बुवा-बाबांचे पितळ उघडे करण्यासाठी व्यूहरचना आखण्यात आली. कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि वक्ता शिबिर भरविण्यासंदर्भात नियोजन केले. आगामी काळात समविचारी नागरिक आणि तरुणांना संघटनेत सहभागी करून त्यांच्या खांद्यावर विविध पदांची धुरा देण्यात येईल व संघटना अधिक मजबूत करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीस जिल्हा अध्यक्ष विवेक सुभेकर, जिल्हा कार्याध्यक्ष मोहन भोईर, जिल्हा प्रधान सचिव संदेश गायकवाड, राज्य सदस्य नीलेश घरत व भाऊ सावंत, जिल्हा बुवाबाजी संघर्ष प्रमुख अमित निंबाळकर, सम्यक क्रांती विचारमंच अध्यक्ष मंगेश वाघमारे, अमोल कांबळे आणि ए. एस. जमदाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com