गोडसई संघाने पटकावला छत्रपती चषक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गोडसई संघाने पटकावला छत्रपती चषक
गोडसई संघाने पटकावला छत्रपती चषक

गोडसई संघाने पटकावला छत्रपती चषक

sakal_logo
By
गोडसई संघ छत्रपती चषकाचा मानकरी एम. आर. एच. फणसवाडी संघाला उपविजेतेपद पाली, ता. ११ (वार्ताहर) : सुधागड तालुक्यातील आंबोलेवाडी येथे वाघेश्वर क्रिकेट क्लबच्या वतीने दोन छत्रपती चषक क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत गोडसई संघाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत पहिल्या दिवशी खुल्या गटातील सामने खेळवण्यात आले. त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील १२ संघांनी सहभाग घेतला. दुसऱ्या दिवशी नवगाव मराठा समाज मर्यादित सामने खेळवण्यात आले. त्यामध्ये देखील १२ संघांनी सहभाग घेतला. सर्व संघांमध्ये उत्कृष्ट खेळीने एम. आर. एच. फणसवाडी संघ व गोडसई संघ अंतिम सामन्यात पोचला. अंतिम सामन्यात फणसवाडी संघावर मात करत गोडसई संघाने छत्रपती चषकाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला. तर द्वितीय क्रमांक एम. आर. एच. फणसवाडी, तृतीय क्रमांक ओवी इलेव्हन ऐनवहाळ व चतुर्थ क्रमांक हंडेवाडी या संघाने पटकावला. विजेत्या संघांना शिवसेना नालासोपारा विभागप्रमुख विनोद पार्टे, माजी सरपंच खंडू उतेकर, दामोदर पार्टे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधागड तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, चंद्रकांत महाडिक, दिलीप गायकर, तुरे सर, प्रमोद उतेकर, बाळाराम मांडवकर उपस्थित होते.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top