वाकण-पाली राज्य मार्गाचे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाकण-पाली राज्य मार्गाचे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह
वाकण-पाली राज्य मार्गाचे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

वाकण-पाली राज्य मार्गाचे कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

sakal_logo
By
वाकण-पाली राज्य मार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा पाली, ता. ११ (वार्ताहर) : वाकण-पाली- खोपोली राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू आहे. या कामाच्या दर्जाबाबत शिवसेना पेण-सुधागड रोहा मतदार संघाचे युवासेना माजी संघटक आशिष यादव यांनी सोमवारी (ता.१०) शंका उपस्थित केली. कामाचा दर्जा सुधारला नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला. पाली- खोपोली मार्गाचे काम सुरू असताना एकही अभियंता किंवा प्रशासन अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे एमएसआरडीसीचे उपअभियंता सचिन निफाडे व आणखी एका अधिकाऱ्यांना याबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, असे यादव यांनी सांगितले. हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने एमएसआरडीसी प्रशासनाने चौकशी करून कामाचा दर्जा सुधारावा, असेही त्यांनी सांगितले. ........... पाली-खोपोली मार्गाबाबत तक्रार आल्यावर या कामाची पाहणी करण्यासाठी जातो. या कामाचा दर्जा नियमाप्रमाणे व चांगला असावा यासाठी नियमित परीक्षण करतो. या कामासंदर्भात वारंवार तक्रारी आल्यास योग्य उपाययोजना करू. - सचिन निफाडे, उपअभियंता, एमएसआरडीसी
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top