कर्जत-नेरळ-डोणे महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भाजपा आक्रमक

कर्जत-नेरळ-डोणे महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भाजपा आक्रमक

कर्जत-डोणे महामार्गाच्या दुरुस्तीसाठी भाजप आक्रमक आंदोलनाचा इशारा कर्जत, ता. १३ (बातमीदार) : कर्जत-नेरळ-डोणे महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी पूर्ण करण्यात आले. या रस्त्याला खड्डे पडले आहेत. सिमेंट क्रॉंक्रीटच्या या मार्गावरील खड्डे सुद्धा डांबराने भरण्यात येत असल्याने भाजपने आंदोलनाचा इशारा दिला आहे. कर्जत-डोणे मार्गावरील खड्ड्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी मागील काही महिन्यांपासून भाजप कार्यकर्त्यांनी कर्जत सावर्जनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अक्षय चौधरी यांच्याकडे केली होती. ती मागणी मान्य होऊन खड्डे बुजविण्याचे काम सुरू आहे. मात्र सिमेंट क्रॉक्रिटच्या रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजवले जात आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. दुरुस्तीचे काम योग्य पद्धतीत करून घ्यावे, अन्यथा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशा इशाऱ्याचे निवेदन भाजप कार्यकर्त्यांनी दिले आहे. भाजप नेते सुनील गोगटे, तालुका सरचिटणीस संजय कराळे, शहर अध्यक्ष बळवंत घुमरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष मयूर शितोळे, विजय कुलकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com