दंडातून खनीकर्म विभागाला सव्वा कोटीची केमाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दंडातून खनीकर्म विभागाला सव्वा कोटीची केमाई
दंडातून खनीकर्म विभागाला सव्वा कोटीची केमाई

दंडातून खनीकर्म विभागाला सव्वा कोटीची केमाई

sakal_logo
By
दंडातून खनिकर्म विभागाला सव्वा कोटीचा महसूल बेकायदेशीर उत्खननाला आवर; वर्षभरात ८६ प्रकरणे उघड सकाळ वृत्तसेवा अलिबाग, ता. १३ : वाळू लिलाव सुरू करूनही कंत्राटदारांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील एकाही खाडीत सध्या यांत्रिकी पद्धतीने वाळू उपसा सुरू नाही. यामुळे सरकारचा कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे; मात्र, त्याचवेळेस बेकायदेशीर गौण खनिजाची परस्पर विक्रीची प्रकरणे वाढली आहेत. यावर आवर घालण्यासाठी खनिकर्म विभागाने दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू केली. यातून तब्बल एक कोटी २० लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाळू उपशाबरोबरच आता विविध कामासाठी मातीचा भरावासाठी वापर करणाऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. प्रत्येक गावात मातीचे उत्खनन होत असले तरी, खनिकर्म विभागाला त्यावर निर्बंध आणता येत नाहीत. वाळूला पर्याय म्हणून ‘क्रश सॅन्ड’चा वापर केला जात आहे. यामुळे बेकायदेशीर दगडखाणींचा व्यवसाय फोफावत आहे. पनवेल, उरण, खालापूर तालुक्यात सर्वाधिक बेकायदा दगडखाणी आहेत. त्यामुळे वर्षभरात ३० दगडखाणींवर कारवाई करत जिल्हा खनिकर्म विभागाने २१ लाख १० हजाराचा दंड वसुल केला. वाळू उपसा करणाऱ्यांनीही पुन्हा डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. वाळू उपशाच्या २८ कारवाईची प्रकरणे आहेत. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर रायगड जिल्ह्यातील सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा, काळ नदीतील वाळू उपसा करण्यास परवानगी दिलेली आहे. सरकारची नियमित रॉयल्टी भरून वाळू उपसा करण्यास कोणताही कंत्राटदार पुढे आलेला नाही. तीन वेळा घेतलेल्या निविदा प्रक्रियेला देखील कोणीही प्रतिसाद दिलेला नव्हता; मात्र, याच वेळी चोरट्या पद्धतीने वाळू उपसा सुरूच असल्याचे दिसून येत आहे. *** अपुरे कर्मचारी आणि राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करण्यास मर्यादा येत असतात. विकासकामांसाठीही हे उत्खनन होत आहे. कायदेशीर वाळू उपसा सुरु व्हावा म्हणून सावित्री खाडी वगळता जिल्ह्यातील खनिजपट्ट्यातील वाळू लिलावाची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मागील वर्षी कोणीही प्रतिसाद दिला नसल्याने लिलाव झालेला नव्हता. - रोशन मेश्राम, खनिकर्म विभाग, रायगड *** अवैध खनिज उत्खननावरील दृष्टीक्षेप प्रकार/ दंड माती/६ लाख, ७५ हजार, ३७९ मुरूम/८२ लाख, ९६ हजार, ३५९ दगड/२१ लाख, १० हजार, ४४१ रेती/९ लाख, ६८ हजार २७१ एकूण/१कोटी २० लाख ५० हजार ४५०
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top