Thur, March 30, 2023

कर्जत मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी मधुकर म्हसे
कर्जत मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षपदी मधुकर म्हसे
Published on : 1 March 2022, 11:29 am
कर्जत, ता. १ (बातमीदार) : अंबरनाथ मराठा शिक्षण प्रसारक मंडळाची संयुक्त वार्षिक सर्वसाधारण सभा कर्जत प्रसारक मंडळाच्या वसतिगृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मधुकर म्हसे यांची सर्वानुमते अध्यक्षपदावर फेरनिवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सूर्याजी ठाणगे, शंकर शेलार यांची निवड करण्यात आली. चिटणीसपदी नितीन दगडे, उपचिटणीस शिवाजी श्रीखंडे, खजिनदार सुरेश काशिनाथ भोईर यांची निवड करण्यात आली. सभेला शंकर पाटील, सदाशिव बैलमारे, भगवान घरत, वासुदेव राणे, उपाध्यक्ष शंकर शेलार, सूर्याजी ठाणगे, सुरेश भोईर, कौशिक वांजळे, भानुदास म्हसे आदी उपस्थित होते.