
मॅकमोहन हुले याची माचाधारेवर यशस्वी चढाई
पाली, ता. २३ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द येथील प्रसिद्ध गिर्यारोहक मॅकमोहन हुले यांनी नुकतेच हिमालयातील १५७०० फूट माचाधारेवर यशस्वी चढाई केली. ते विक्रमासाठी हिमालयातील सर्व शिखरांवर चढाई करणार आहेत.
हुले यांनी सांगितले की, एखाद्या शिखरावर यशस्वी चढाई केल्यानंतर अविस्मरणीय आनंद मिळतो. पर्वतीय वातावरणात व्यायामाचा आनंद सुद्धा मिळतो. प्रत्येक वेळी आश्चर्यचकित होऊन आत्म-शोध अधिक खोलवर आणण्याची प्रक्रियादेखील असते. प्रत्येक चढाईनंतर थोडे पुढे आपण कोण आहोत, आपण किती पुढे जाऊ शकतो, आपली क्षमता काय आहे, आदींचा शोध पूर्ण होतो.
हिमालयातील सर्व शिखर करणार सर
हिमालयात जगातील सर्वात उंच पर्वतांचा समावेश आहे. त्यांच्या उंचावरील उंच, उंच-बाजूची दातेरी शिखरे, दऱ्या आणि अल्पाइन हिमनदी, खोल नद्यांचे घाट आहेत. या भागातील सर्व अवघड शिखरे सर करण्याचा मानस आहे, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..