सीएसएमटीचा पुनर्विकास १ हजार ३५० कोटी रुपयांत केला जाणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीएसएमटीचा पुनर्विकास १ हजार ३५० कोटी रुपयांत केला जाणार
सीएसएमटीचा पुनर्विकास १ हजार ३५० कोटी रुपयांत केला जाणार

सीएसएमटीचा पुनर्विकास १ हजार ३५० कोटी रुपयांत केला जाणार

sakal_logo
By
हायब्रीड पद्धतीने ‘सीएसएमटी’चा पुनर्विकास एक हजार ३५० कोटी रुपयांत केला जाणार कुलदीप घायवट मध्य रेल्वेचे मुख्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि जागतिक वारसा इमारतीचे रूप आगामी काळात पालटण्यात येणार आहे. विमानतळाच्या धर्तीवर या स्थानकात सर्व सोयी-सुविधा देण्यात येणार असून, त्यासाठी एक हजार ३५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) या तत्त्वाऐवजी ‘हायब्रीड मॉडेल’ पद्धतीने सीएसएमटीच्या पुनर्विकासाचे काम होणार आहे. ---------------- सीएसएमटी हे सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी एक महत्त्वाचे स्थानक आहे. या स्थानकावर उपनगरीय आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमधून सुमारे १६ लाख प्रवासी दररोज ये-जा करतात. वाढती प्रवासी संख्या आणि त्यांना सुविधा देण्याच्या उद्देशाने स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. पुनर्विकासाचे काम मध्य रेल्वे, रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाकडून करण्यात येणार आहे. नव्या पद्धतीनुसार एकूण खर्चाच्या ४० टक्के निधी रेल्वेकडून उभारण्यात येईल. उर्वरित ६० टक्के निधी हा कर्जाऊ पद्धतीने घेण्यात येईल. हा ६० टक्के निधी परत देण्यासाठी २७ वर्षांचा करार करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित विकासकाला सीएसएमटी स्थानकात व्यावसायिक तत्त्वावर जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. भारतीय रेल्वे स्टेशन विकास कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरएसडीसी) यांच्या वतीने सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास केला जाणार आहे. यावेळी सीएसएमटीला १९३० मधील लूक दिला जाणार आहे. जानेवारी २०२१ मध्ये सीएसएमटीच्या पुनर्विकासाच्या कामाला एकूण १० खासगी कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यापैकी ९ कंपन्या पात्र ठरल्या आहेत. --------------------------- रेल्वे परिसरात... - २.५४ लाख चौरस मीटरची जागा व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होणार - प्रवाशांसाठी गॅलरी, बसण्याची जागा, कॅफेटेरिया, वाहनतळाची जागा - लांब पल्ल्याच्या गाड्यांचे तिकीट केंद्र स्थलांतरित होणार - इमारतीचा काही भाग पाडून हेरिटेज गॅलेरी उभारली जाणार नव्या प्रस्तावात - रेल्वे स्थानकात ये-जा करण्यासाठी क्रॉफर्ड मार्कट येथून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव - १८ फलाटांना जोडणारा पादचारी पूल क्रॉफर्ड मार्कट आणि सीएसएमटीच्या बाहेरील दिशेकडील डी. एन. रोडला जोडणार - पी. डी. मेलो रोड दिशेने हार्बर मार्गाचे स्थलांतरण - स्थानकाचा पुनर्विकास ‘ग्रीन बिल्डींग’ संकल्पनेद्वारे केला जाणार - सुरक्षा व्यवस्था, सीसी टीव्ही कॅमेरे अद्ययावत केले जाणार - डीआरएम इमारत पाडून नवे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय उभारणार पीपीपी मॉडेलऐवजी हायब्रीड मॉडेलने सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या कामाला वित्त मंत्रालय, रेल्वे मंत्रालय, निती आयोग यांच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. याला तत्त्वत: मान्यता दिली असून, हा प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. - अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top