सुष्मिता सेनचे बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुष्मिता सेनचे बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात
सुष्मिता सेनचे बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात

सुष्मिता सेनचे बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात

sakal_logo
By
सुष्मिता सेनचे बॉयफ्रेंडसोबतचे नाते संपुष्टात बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. अगदी कौटुंबिक समारंभापासून बॉलिवूड पार्ट्यांपर्यंत हे जोडपं सोबत दिसायचं. इतकंच नाही तर रोहमन सुष्मिताच्या घरीच राहायचा. मध्यंतरी ते दोघे लग्न करणार अशाही चर्चा होत्या, पण त्याआधीच रोहमनने सुष्मिताचं घर सोडलं आणि दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू झाल्या. आता सुष्मिताने ब्रेकअपच्या बातमीवर शिक्कामोर्तब केलं आहे. सुष्मिताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकून ब्रेकअपची बातमी कन्फर्म केली आहे. ''आमच्या नात्याची सुरुवात मित्र म्हणून झाली आणि यापुढेही आम्ही मित्र म्हणूनच ओळखले जाऊ. नातं फार आधीच संपलं होतं... प्रेम अद्यापही बाकी आहे,’ अशी पोस्ट सुष्मिताने शेअर केली आहे. यासोबत रोहमनसोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. रोहमन हा सुष्मितापेक्षा १५ वर्षांनी लहान होता. त्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीची चर्चा सुरू झाली. तेव्हाच हे नातं फार काळ टिकणार नाही, असं मतं अनेकांनी व्यक्त केलं होतं.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..