पाण्याच्या पिंपात आढळला मुलाचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाण्याच्या पिंपात आढळला मुलाचा मृतदेह
पाण्याच्या पिंपात आढळला मुलाचा मृतदेह

पाण्याच्या पिंपात आढळला मुलाचा मृतदेह

sakal_logo
By
पाण्याच्या पिंपात आढळला मुलाचा मृतदेह सकाळ वृत्तसेवा, ठाणे, ता. २५ : कळवा येथील साईबानगर झोपडपट्टी परिसरात एक पाण्याच्या पिंपात पाच महिन्याच्या मुलाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कळवा येथील साईबानगर येथील झोपडपट्टीमध्ये शंकर चव्हाण आणि शांती चव्हाण हे दाम्पत्य वास्तव्यास आहे. शंकर हा बिगारीच काम करतो. शुक्रवारी (ता. २४) दुपारी २ ते ३ च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या पाच महिन्याच्या मुलाला घरातून उचलून नेले. त्यानंतर मुलगा बेपत्ता झाल्याने चव्हाण दाम्पत्याने कळवा पोलिस ठाण्यात मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती. याच दरम्यान, त्या मुलाचा मृतदेह घराबाहेरील पाण्याच्या पिंपात आढळून आला. त्यामुळे ही हत्या तर नाही ना असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे. मात्र, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यासह सहायक पोलिस आयुक्त व्यंकट आंधळे आणि कळवा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..