साईबाबा संस्थानकडून मुदत संपलेल्या तुपाची विक्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साईबाबा संस्थानकडून मुदत संपलेल्या तुपाची विक्री
साईबाबा संस्थानकडून मुदत संपलेल्या तुपाची विक्री

साईबाबा संस्थानकडून मुदत संपलेल्या तुपाची विक्री

sakal_logo
By
साईबाबा संस्थानकडून मुदत संपलेल्या तुपाची विक्री ई-निविदा जारी, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २५ : शिर्डी येथील साईबाबा संस्थानकडील मुदत संपलेले गाईचे तूप विक्रीस काढण्यात आले आहे. त्यासाठी ई-निविदाही जारी करण्यात आल्या आहेत. मुदत संपलेल्या तुपाची विक्री करण्यास ऑल फूड अँड लायसेन्स होल्डर फाऊंडेशनने विरोध केला असून याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. साईबाबा संस्थानकडून प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या लाडूसाठी मे. हर्ष फ्रेश डेअरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.भगवानपूर, हरिद्वार यांच्याकडून तूप खरेदी करण्यात आले होते. कोरोना काळात संस्थान बंद असल्याने लाडू प्रसादही बंद होते. दरम्यानच्या कालावधीत तूप वापराविना पडून होते. सदर तूप वापरायची अंतिम मुदत ४ ऑक्टोबर २०२१ रोजी संपली आहे. त्यामुळे संस्थानकडून तब्बल २१८ क्विंटल तुपाचे एक हजार ४५४ डब्बे विक्रीस काढण्यात आले आहेत. ई-निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेण्यासाठी निविदेची रक्कम १५ हजार रुपये आणि बयाणा रक्कम म्हणून तीन लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले आहे. इतकेच नव्हे, त्यात कुणालाही सवलत मिळणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडून निविदा सूचनेमध्ये सांगण्यात आले आहे. दरम्यान, ऑल फूड अँड लायसेन्स होल्डर फाऊंडेशनने मुदत संपलेल्या तुपाची विक्री करण्यास हरकत घेतली आहे. त्यांनी साईबाबा संस्थानच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार देखील दाखल केली आहे. मुदत संपलेल्या कोणत्याही अन्न पदार्थाची विक्री करता येत नाही. त्यामुळे साईबाबा संस्थानची विक्री निविदा थांबवून योग्य कारवाईची मागणी ऑल फूड अँड लायसेन्स होल्डर फाऊंडेशनने राष्ट्रीय अध्यक्ष अभय पांडे यांनी केली आहे. .......... प्रतिक्रिया तूप विक्रीचा निर्णय माझ्यापूर्वी तदर्थ समितीने घेतला आहे. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. सध्या ही प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. - भाग्यश्री बानायत, मुख्य कार्यकारी अधिकारी, साईबाबा संस्थान शिर्डी. ........ तूप विक्रीबाबत साईबाबा संस्थानला कायदेशीर नोटीस दिली आहे. त्यांना अशाप्रकारे तुपाची विक्री करता येणार नाही. - चंद्रशेखर साळुंखे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, नाशिक विभाग.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..