३१ डिसेंबरच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

३१ डिसेंबरच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याचे आदेश
३१ डिसेंबरच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याचे आदेश

३१ डिसेंबरच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याचे आदेश

sakal_logo
By
हॉटेल्स, पबना सीसीटीव्ही फुटेज जमा करण्याचे आदेश नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. १ : हॉटेल्स, उपाहारगृह, पब, डिस्कोथेकमधील ३१ डिसेंबरच्या रात्रीचे सीसीटीव्ही फुटेज १५ दिवसांत महापालिकेच्या संबंधित प्रभागात जमा करायचे आहे. यांना सोमवारपासून सीसीटीव्ही फुटेज पाठवण्याबाबात पत्र पाठवण्यास महापालिकेकडून सुरुवात होणार आहे. ज्या ठिकाणी ५० टक्के क्षमतेपेक्षा जास्त गर्दी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईतील हॉटेल्सना ५० टक्के क्षमतेने व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री होणारी गर्दी लक्षात घेऊन त्या वेळचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचा निर्णय मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केला होता. यात जर कोणत्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झालेले आढळल्यास ते ठिकाण सील करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top