मराठी व्यावसायिकांसाठी

मराठी व्यावसायिकांसाठी

मराठी व्यावसायिकांसाठी दुबई दौऱ्याचे आयोजन मुंबई, ता. १ : महाराष्ट्रातील व्यावसायिकांना दुबई, तसेच आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढविण्याची संधी मिळावी यासाठी महाबीज परिषदेतर्फे दुबई दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्यात अनेक तज्ज्ञांचे व्यवसायवृद्धीसाठी मार्गदर्शन मिळेल, तसेच तेथील संबंधित उद्योजकांशीही संपर्क करता येणार आहे. महाबीज परिषदेचे ब्रिजमोहन चौधरी आणि श्रीपाद कुलकर्णी यांनी या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. १७ ते २२ फेब्रुवारीदरम्यान हा दुबईचा दौरा होईल. आखाती देशातील व्यवसाय संधी, परदेश व्यापारातील अडचणी याबाबत दौऱ्यात तज्ज्ञ अतुल ठाकूर माहिती देतील; तर महिला उद्योजकांना श्वेता इनामदार मार्गदर्शन करतील. आंतरराष्ट्रीय व्यवसाय प्रेझेंटेशन कसे करावे, आंतरराष्ट्रीय व्यावसायिकांशी नेटवर्किंग आणि व्यवसायसंधी आदींबाबत अतुल ठाकूर या परिषदेत मार्गदर्शन करतील. सध्याचे दुबई एक्स्पो ३१ मार्चपर्यंत सुरू असून फेब्रुवारीत तेथे गल्फ फूड फेअर भरणार आहे. तसेच १९ आणि २० फेब्रुवारी रोजी तेथे महाबीज बिझनेस कॉन्फरन्स होणार आहे. मराठी व्यावसायिकांचा आखाती देशांमध्ये व्यवसाय वाढावा, यासाठी कार्यरत अशी ही संस्था आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या महाबीज बिझनेस कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या राज्यातील कित्येक उद्योजकांना आखाती देशात व्यवसाय वाढीची संधी मिळाली, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com