दादर चौपाटीवर ‘पुनीत सागर’ अभियान

दादर चौपाटीवर ‘पुनीत सागर’ अभियान

दादर चौपाटीवर पुनीत सागर अभियान मुंबई, ता. २ ः दादर चौपाटीवर गुरुवारी (ता. ३०) ‘पुनीत सागर अभियान’ राबविण्यात आले. महाराष्ट्र बटालियन एनसीसी मुंबई बी ग्रुपच्या ७० एनसीसी कॅडेट्सनी या अभियानात सहभाग घेतला. पथनाट्य, कविता, जनजागृती करणारी पोस्टर बनवून समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता तसेच, प्लास्टिकमुळे उद्भवणाऱ्या समस्यांबाबत जागरुकता निर्माण केली. यात कीर्ती महाविद्यालय, सिद्धार्थ महाविद्यालय, बी. एन. बांदोडकर महाविद्यालय, महाराष्ट्र महाविद्यालय आणि रिझवी महाविद्यालयाच्या एन. सी. सी. कॅडेट्सनी सक्रिय सहभाग घेतला होता. महापालिकेने कचरा जमवण्याच्या गाड्या उपलब्ध करून देऊन अभियानास हातभार लावला. ग्रुप कॅप्टन नीलेश देखणे, लेफ्टनंट कर्नल संदेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान चालवण्यात आले. अभिनेत्री व समाजसेविका नीना कुलकर्णी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या. कीर्ती कॉलेजचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय पवार यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. या अभियानात सुमारे ८५० किलो ओला कचरा जमा कोला. ‘पुनीत सागर अभियान’ हे समुद्रकिनाऱ्यांना प्लास्टिक आणि इतर कचऱ्यापासून मुक्त करण्याबाबतची जागृती निर्माण करणारे एक राष्ट्रव्यापी अभियान आहे. याचा मूळ उद्देश आपल्या देशाची जनता आणि येणाऱ्या भावी पिढीला स्वच्छ समुद्रकिनाऱ्यांच्या महत्त्वाबद्दल संदेश देणे, हा आहे. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com