आज पासून मुलांचे लसीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आज पासून मुलांचे लसीकरण
आज पासून मुलांचे लसीकरण

आज पासून मुलांचे लसीकरण

sakal_logo
By
आजपासून अल्पवयीन मुलांचे लसीकरण २८ दिवसांत मोहीम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ : मुंबईतील १५ ते १८ वयोगटातील मुलांची लसीकरण मोहीम आजपासून (सोमवार) सुरू होत आहे. मुलांसाठीच्या नऊ विशेष कोविड लसीकरण केंद्रांवर लसीकरण होणार आहे. पहिल्या दिवशी किमान तीन हजार मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिन लसीचा वापर करण्यात येणार आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांना आपल्या पालकांच्या सहमतीने केंद्रावर येऊन वॉक इन नोंदणी करून लस घेता येणार आहे. पालकांना आपल्या पाल्यांची नोंदणी करूनदेखील लस घेता येणार आहे. ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमांतून नोंदणीची सोय उपलब्ध आहे. १५ ते १८ वयोगटातील म्हणजेच २००७ वा त्यापूर्वी जन्मलेली मुले लसीकरणासाठी पात्र राहतील. मुंबईत या वयोगटातील साधारणतः नऊ लाख मुले आहेत. पुढील २८ दिवसांत सर्व मुलांचे लसीकरण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. आठवडाभर लसीकरण मोहिमेची ट्रायल रन घेऊन निरीक्षण करण्यात येईल. यादरम्यान लसीकरणात येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार बदल केले जातील, अशी माहिती काकाणी यांनी दिली. ... या केंद्रांवर घ्या लस रिचर्डसन क्रुडास भायखळा- ए, बी, सी, डी, ई या पाच प्रशासकीय विभागांसाठी भायखळ्यामधील रिचर्डसन क्रुडास भायखळा कोविड लसीकरण केंद्र सोमय्या जम्‍बो कोविड- एफ/उत्तर, एल, एम/पूर्व, एम/पश्चिम एनएससीआय डोम वरळी- एफ/दक्षिण, जी/दक्षिण, जी/उत्तर बीकेसी जम्‍बो कोविड केंद्र- एच/पूर्व, के/पूर्व, एच/पश्चिम नेस्‍को जम्‍बो कोविड केंद्र, गोरेगाव- के/पश्चिम, पी/दक्षिण मालाड जम्‍बो कोविड केंद्र- आर/दक्षिण, पी/उत्तर दहिसर जम्‍बो कोविड केंद्र- आर/मध्य, आर/उत्तर विभाग क्रॉम्‍प्‍टन अँण्ड ग्रीव्‍हस् जम्‍बो कोविड केंद्र, कांजूरमार्ग- एन, एस विभाग रिचर्डसन क्रुडास जम्‍बो कोविड केंद्र मुलुंड- टी विभाग डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे रुग्णालय- रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ... अशीदेखील व्यवस्था : लस घेतलेल्या मुलांना लसीकरण केंद्रावरच अर्धा ते पाऊण तास थांबावे लागणार आहे. यासाठी लस घेतलेल्या मुलांच्या आरामाची; तर पालकांसाठी प्रतीक्षा कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय मुलांसह पालकांना आवश्यकतेनुसार अल्पोपाहारदेखील दिला जाणार आहे. .... सौम्य लक्षणे दिसण्याची शक्यता: लसीकरणानंतर ताप येणे, हात दुखणे अशी सौम्‍य लक्षणे क्वचितप्रसंगी आढळून येऊ शकतात. अशा वेळी घाबरून न जाता वैद्यकीय सल्ल्यानुसार औषधे घ्यावीत. त्‍याचप्रमाणे इतर काही त्रास उद्‍भवल्‍यास नजीकच्‍या महानगरपालिका रुग्‍णालयात संपर्क साधावा, असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले. .... राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे-कुर्ला संकुल कोविड लसीकरण केंद्रातून या मोहिमेला सकाळी ११ वाजता सुरुवात होणार आहे. याप्रसंगी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, उपमहापौर ॲड. सुहास वाडकर, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी हे उपस्थित राहणार आहेत.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top