एनसीबी अधिकारी पंचावर दबाव टाकीत आहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एनसीबी अधिकारी पंचावर दबाव टाकीत आहेत
एनसीबी अधिकारी पंचावर दबाव टाकीत आहेत

एनसीबी अधिकारी पंचावर दबाव टाकीत आहेत

sakal_logo
By
अधिकारी पंचावर दबाव टाकीत आहेत नवाब मलिक यांचा एनसीबी अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. २ ः राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वाद काही संपण्याची चिन्हे नाहीत. नवाब मलिक यांनी एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबी अधिकारी पंचांवर दबाव आणीत आहेत. ते पंचनामा आणि जबाब बदलतात आणि खोटी प्रकरणे तयार करीत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी एक पंच आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या संवादाच्या दोन ध्वनिचित्रफिती प्रसारित केल्या आहेत. एनसीबीच्या एका जुन्या प्रकरणातील पंच मॅडी याचे आणि एनसीबीच्या एका अधिकाऱ्याचे फोनवरील संभाषण मलिक यांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात तो अधिकारी मॅडी याला पंचनाम्यावर सही करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे ऐकू येत आहे. पंचनाम्यावर सही करायची आहे आणि तो तुझ्यासमोर करण्यात आल्याचे तुला सांगायचे आहे, असे ‘एनसीबी’चा अधिकारी मॅडी याला सांगत असल्याचे मलिक यांनी म्हटले आहे. सही केल्यानंतर कार्यालयाबाहेर भेटण्याची सूचनाही एनसीबी अधिकारी पंचाला करीत असल्याचे संभाषणात ऐकू येत आहे. मॅडी हा समीर वानखेडे यांना फोन करून या प्रकरणात मला भीती वाटत असल्याचे सांगत आहे. त्यावर वानखेडे हे न घाबरता सही करण्यास सांगत असल्याचे मलिक म्हणाले. त्याच वेळी दुसऱ्या संभाषणातील व्यक्ती ही समीर वानखेडे हेच असल्याचे मलिक यांनी सांगितले. मात्र, एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. ... सूडबुद्धीमागे भाजपचा हात समीर खान प्रकरणातही एनसीबी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. खान प्रकरणात मुख्य करण सजनानी आहे. त्याला सोडून समीरच्या जामिनाला एनसीबी का विरोध करत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एनसीबी मला घाबरवण्याचा प्रयत्न करीत आहे; पण चुकीच्या विरोधात मी बोलतच राहणार असल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले. ‘एनसीबी’चे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे यांना मुदतवाढ मिळावी म्हणून मुंबई भाजपचे काही नेते प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. ...
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top