मालमत्ताकारत कल्याण-डोंबिवलीकरांना दुजाभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ताकारत कल्याण-डोंबिवलीकरांना दुजाभाव
मालमत्ताकारत कल्याण-डोंबिवलीकरांना दुजाभाव

मालमत्ताकारत कल्याण-डोंबिवलीकरांना दुजाभाव

sakal_logo
By
मालमत्ता करात कल्याण-डोंबिवलीकरांना दुजाभाव जागरूक नागरिक मंचचा आरोप कल्याण, ता. ३ (बातमीदार) ः मुंबईमध्ये अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असून आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर तेथील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीमध्येही शिवसेनेची सत्ता असून येथे दुजाभाव होतो आहे, अशी टीका जागरूक नागरिक मंचच्या वतीने करण्यात आली आहे. मालमत्ता कर कमी नको, मात्र मालमत्ता करात केलेली २२ टक्के कर वाढ कमी करण्याची मागणी जागरूक नागरिक मंचचे संस्थापक-अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. केडीएमसी हद्दीत विकासकांना ओपन लँड टॅक्समधून सवलत मिळावी म्हणून पालिका प्रशासनाने आधीच जमिनींचा रेडीरेकनरचा दर ६४. ३५ टक्के कमी केलेला आहे. हा कमी केलेला रेडीरेकनरचा दर नागरिकांच्या मालमत्ता कराला सुद्धा आपोआपच लागू होतो. त्यामुळे आत्ता जी बिले नागरिकांना मिळालेली आहेत, ती बिले चुकीची असून त्यातही ६४ टक्के सवलत नागरिकांना मिळणे भाग आहे, अशी मागणी जागरूक नागरिक मंचने केली आहे. ही मागणी पाच तारखेपर्यंत मान्य झाली नाही तर दहा जानेवारीपासून जागरूक नागरिक मंचच्या वतीने बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती घाणेकर यांनी दिली आहे. दोन्ही महापालिकांमध्ये सत्ता एकाच पक्षाची असल्याने मालमत्ता करात सवलतीची मागणी अत्यंत रास्त आहे. महापालिकेची आर्थिक बाजू कमकुवत असेल तर आर्थिक बोजा राज्य सरकारने सहन करावा. - श्रीनिवास घाणेकर, संस्थापक, जागरूक नागरिक मंच.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top