ओमकार मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य पदके मिळवून बाजी

ओमकार मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंची राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत एकूण ९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य पदके मिळवून बाजी

किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईकरांना २४ पदके शिवडी, ता. ३ (बातमीदार) ः पुणे येथे रविवारी (ता. २) पार पडलेल्या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भांडुप पूर्वमधील ओमकार मार्शल आर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, ९ रौप्य आणि ६ कांस्य पदके पटकावण्याची कामगिरी बजावली. या स्पर्धेत २६ राज्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये अंशुल फडके याने २ सुवर्ण व १ रौप्य, गौरी बोडके हिने २ सुवर्ण, आयुषी नारखेडे २ सुवर्ण, श्रुती परब १ सुवर्ण, श्रावणी पाटणकर १ सुवर्ण, अविनाश चौगुले १ सुवर्ण पदक जिंकले; तर सानिया बंगेरा २ रौप्य, दिशा पाटील २ रौप्य, सानवी देसाई १ रौप्य, १ कांस्य, मैत्री पाटील १ रौप्य, १ कांस्य, राज तेली १ रौप्य आणि १ कांस्य, हृधान सावंत १ रौप्य, वेधा मोरे २ कांस्य, सोहम परब १ कांस्य, ऋतिक कदम आदींनी पदकांची कमाई केली. ओमकार शिवणकर यांनी पदक विजेत्य खेळाडूंना प्रशिक्षण दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com