मुंबईनंतर आता, ठाणेकरांना कर माफीची प्रतीक्षा

मुंबईनंतर आता, ठाणेकरांना कर माफीची प्रतीक्षा

मुंबईनंतर आता ठाणेकरांना करमाफीची प्रतीक्षा ठाणे, ता. ३ ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषणा करून मुंबईतील ५०० चौरस फुटाच्या मालमत्तांना करमाफी जाहीर केली. त्यानंतर आता ठाणेकरांनीदेखील करमाफीची मागणी केली आहे. ठाणेकर नागरिकांच्या ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा प्रस्ताव मागील महिन्यात झालेल्या महासभेत मंजूर झाला होता. त्यानंतर ज्यांच्या घरांचे चटईक्षेत्र ५०० चौरस फुटांचे असेल किंवा त्यापेक्षा कमी, अशा सर्वच निवासी मालमत्ताधारकांना आता मालमत्ता कर माफ करण्याचा ठराव करण्यात आला असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती महापौर नरेश म्हस्के यांनी दिली. हा ठराव मंजूर झाल्यास पालिकेच्या तिजोरीवर सुमारे दीडशे कोटींचा बोजा पडेल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. ठाणे महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने ठाणेकरांना ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचे वचन दिले होते. त्यानुसार ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफीचा ठराव मागील महिन्यात झालेल्या महासभेत करण्यात आला. त्यानंतर हा ठराव अंतिम करण्यासाठी त्यात काही सूचनादेखील पुढे आल्या होत्या. त्यानुसार आता सरसकट ज्यांचे चटईक्षेत्र ५०० चौरस फुटांचे असेल अशा सर्वांनाच मालमत्ता कर माफीचा ठराव अंतिम करण्यात आला आहे. त्यानुसार ज्यांचे चटईक्षेत्र ५०० चौरस फूट व त्याहून कमी क्षेत्रफळ असेल, अशा निवासी मिळकतींचा मालमत्ता कर हा २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून माफ करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार यातून होणारी तूट भरून काढण्यासाठी महापालिकेने इतर उत्पन्न स्रोतांच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करावा, असेही या ठरावात नमूद करण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष मुंबईकरांना ५०० चौरस फुटांचा मालमत्ता कर माफ करण्यात आला आहे. त्यानंतर आता ठाणेकर नागरिकांना करमाफी मिळणार का, याविषयी चर्चा सुरू आहे. पालिकेने आधीच याविषयीचा ठराव सरकारकडे पाठवला आहे. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com