नव्या रेल्वेपुलावरून धीम्या लोकल धावू लागल्या

नव्या रेल्वेपुलावरून धीम्या लोकल धावू लागल्या

नव्या रेल्वे पुलावरून लोकल सेवा सुरू वेगमर्यादेमुळे कूर्मगतीने वाहतूक सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ३ : मध्य रेल्वेमार्गावरील ठाणे ते दिवा पाचव्या-सहाव्या मार्गिकेसाठी घेण्यात आलेला २४ तासांचा जम्बो मेगाब्लॉक सोमवारी (ता. ३) मध्यरात्री दोन वाजता पूर्ण झाला. मुंब्रा-कळवादरम्यानच्या नव्या रेल्वे पुलाच्या क्षमतेची चाचणी रात्रीच दोन इंजिन चालवून घेतल्यानंतर आज सकाळपासून त्यावरून लोकल धीम्या गतीने चालवण्यात आल्या. चाचणी यशस्वी झाली असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर वेगमर्यादा ठेवण्यात आली आहे. त्यामुळे लोकल सेवा १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. ठाणे-दिवादरम्यान नव्या मार्गिकेसाठी आतापर्यंत दोन ब्लाॅक घेण्यात आले. पहिल्या ब्लाॅकनंतर कळवा-मुंब्रादरम्यानचा बोगदा क्रमांक एकमधून धिमी लोकल सेवा सुरू करण्यात आली. दुसऱ्या ब्लाॅकमध्ये मुंब्राजवळील नव्या रेल्वे पुलावरून धीमी लोकल सेवा सुरू झाली आहे. पुढील तीन ते चार दिवस सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-दिवादरम्यान धीम्या मार्गावरील लोकलच्या वेगावर निर्बंध आहेत. शक्य तितक्या लवकर वेगमर्यादा शिथिल करण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. ---–------ रविवारी पुन्हा ३६ तासांचा ब्लॉक येत्या संपूर्ण आठवड्यात ठाणे-दिवा मार्गावर ओव्हरहेड वायर दुरुस्तीबरोबरच रेल्वेमार्गावरील छोटी-छोटी कामे केली जाणार आहेत. लोकल सेवेला अडथळा होणार नाहीत अशी कामे शनिवार (ता. ८) पर्यंत केली जाणार आहेत. ९ आणि १० जानेवारी रोजी ३६ तासांचा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यावेळीही नव्याने रेल्वे रूळ तोडणी-जोडणीचे काम केले जाणार आहे, अशी माहिती एमआरव्हीसी अधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com