वाशीत सुटसुटीत ट्रॅक

वाशीत सुटसुटीत ट्रॅक

वाशीत सुटसुटीत ट्रॅक आरटीओकडून चाचणीसाठी निर्मिती; कौशल्यपूर्ण चालक निर्माण होणार सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : वाशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या एपीएमसी मार्केट सेक्टर १९ मध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ड्राइव्हिंग टेस्ट ट्रॅकची निर्मिती केली आहे. जप्त वाहन ठेवण्यासाठी असलेल्या जागेचे नियोजन करून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन गावंडे यांनी ही कामगिरी केली. या ट्रॅकमुळे कौशल्यपूर्ण चालक निर्माण होण्यासाठी मदत होणार असल्याचे गावंडे यांनी सांगितले. वाशी आरटीओ कार्यालयातून दैनंदिन ट्रान्सपोर्ट, नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांची ड्राइव्हिंग टेस्ट घेण्यात येते. गेल्या वर्षभरात नॉनट्रान्स्पोर्ट २६,१७४; तर ४,२५८ ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आल्या असून अशा एकूण वर्षभरात ३० हजार ४३२ ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यात आल्या. त्यानंतर आता या ट्रॅकची दुरुस्ती करून ट्रॅकच्या आजूबाजूला जप्त केलेल्या वाहनांचे ढिगारेसुद्धा हटवून सुटसुटीत ट्रॅक तयार करण्यात आला आहे. ... दुचाकीसाठी आठप्रमाणे ट्रॅक तयार केला असून, चारचाकी एल ट्रॅकची बांधणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता ड्रायविंग टेस्टच्या संख्येत वाढ होणार असून उत्तम चालक निर्माण करण्यास मदत होणार आहे. - गजानन गावंडे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com