न

वसई-विरार पालिकेची निवडणूक जूनमध्ये कोरोना, ओबीसी, नवीन प्रभाग रचनेमध्ये अडकली प्रक्रिया विरार, ता. ४ (बातमीदार) : राज्यात आमदारांची पोटनिवडणूक, जिल्हा बँकांच्या निवडणुका, विधान परिषदेची निवडणूक होत असताना गेल्या सव्वा वर्षापासून वसई-विरार महापालिकेची निवडणूक मात्र कोरोनाच्या लाटा, ओबीसी आरक्षण, प्रभागरचना या कारणाने पुढे ढकलली जात आहे. आता तर या निवडणुकीला जूनचा मुहूर्त मिळणार असल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने मात्र न्यायालयात दिलेल्या आश्वासनानुसार ही निवडणूक १५ मेपूर्वी घेण्याचे सांगितले असले, तरी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे ती मे महिन्यानंतरच होण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे २८ जून २०२० रोजी अस्तित्वात येणाऱ्या वसई-विरार पालिकेची निवडणूक पुढे ढकलून त्या ठिकाणी प्रशासक बसवला होता, परंतु त्यानंतर राज्यात अनेक पोटनिवडणुका, जिल्ह्या बँकांच्या निवडणुका, ओबीसींच्या मुद्द्यावरून झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुका झाल्या, परंतु वसई-विरारच्या पालिकेची निवडणूक सातत्याने पुढे ढकलण्यात आली होती. त्याचप्रमाणे नवी मुंबई पालिकेची निवडणूकही पुढे ढकलण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून शशांक पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयात सुनावणीवेळी निवडणूक आयोगाचे वकील ॲड. सचिंद्र शेट्टे यांनी मेअखेरीस निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईल असे न्यायमूर्ती अमजद सय्यद व न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठाला सांगितले होते. न्यायालयात शशांक पाटील यांच्या वतीने ॲड. श्रेय शहा व अक्षा शहा यांनी काम पाहिले. त्यामुळे वसई-विरार आणि नवी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्रितपणे १५ मे पूर्वी होणार हे नक्की होत असतानाच आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा ही निवडणूक पुढे जाण्याचे संकेत मिळत आहेत. कोरोनाच्या निमित्ताने विरोधकांच्या हाती असलेल्या पालिकांवर प्रशासकाच्या माध्यमातून आपले वर्चस्व ठेवण्याचे कारस्थान महाविकास आघाडी राबवत आहे. - मनोज बारोट, भाजप जिल्हा उपाध्यक्ष, वसई-विरार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com