ठाण्यातील नेत्यांना कोरोनाने गाठले

ठाण्यातील नेत्यांना कोरोनाने गाठले

ठाण्यातील नेत्यांना कोरोनाने गाठले एकनाथ शिंदेंसह खासदार विचारे आणि आमदार सरनाईकांना लागण सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ४ ः राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाणे लोकसभा मतदार संघाचे खासदार राजन विचारे यांच्यासह ओवळा-माजिवडा मतदार संघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकत्ती उत्तम असून त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे; तर आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृत्ती उत्तम आहे. राजन विचारे यांनादेखील घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. अधिवेशनाच्या पाच दिवसांमध्ये राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैद्यकीय उपचार सुरू असून माझी प्रकृत्ती उत्तम आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनावर मात करून लवकरच आपल्या सेवेकरिता हजर होईन. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी. माझी सर्वांना विनंती आहे, की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दरम्यान, खासदार राजन विचारे यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती पुढे आली आहे. विचारे हेदेखील सोमवारी एकनाथ शिंदे यांच्यासमवेत न्हावा-शेवा येथे पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मंगळवारी सकाळी कोरोना चाचणी केली असता माझी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी ठीक आहे, काळजी नसावी, परंतु मी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने मागील दोन ते तीन दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व आपली तसेच परिवाराची काळजी घ्यावी, असे विचारे यांनी म्हटले आहे; तर ओवळा-माजिवडा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हेदेखील कोरोनाबाधित झाले आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार घेत असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com