तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी २० हजार ३२६ बेडस् सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ४ ः कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या सुमारे २० हजार ३२६ बेडस् उपलब्ध असून त्यापैकी ९,०४४ ऑक्सिजन बेड्स आहेत. एप्रिल २०२१ मध्ये आढळून आलेल्या जिल्ह्यातील एका दिवसाची सर्वोच्च रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याच्या तीनपट ऑक्सिजनची उपलब्धता करण्याचे नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. नागरिकांनी सावधानता बाळगत कोरोना नियमाच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्ह्यातील उपचारांच्या सुविधांनुसार सीसीसीमध्ये ६,८२५, डीसीएचसीमध्ये ६,९२८, डीसीएचमध्ये ६,५७३ अशा एकूण २० हजार ३२६ रुग्णशय्यांची उपलब्धता आहे. त्यामध्ये विलगीकरणासाठी ८,४९०, ऑक्सिजनची सोय असलेल्या ९,०४४, अतिदक्षता विभागातील २,७९२ रुग्णशय्यांचा समावेश आहे. ३ जानेवारीच्या अहवालानुसार ठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर हा सुमारे ७.४५ टक्के असून रुग्ण बरे होण्याचा दर ९७ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात प्रति दशलक्ष लोकसंख्येमागे ८ लाख ९१ हजार ४८७ एवढ्या चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात ६ हजार ३१८ सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ९०० रुग्ण सीसीसीमध्ये, २४९ रुग्ण डीसीएचसी मध्ये, ४६४ रुग्ण डीसीएचमध्ये उपचार घेत आहेत. सुमारे ३ हजार ३९६ रुग्ण गृह विलगीकरणात राहून उपचार घेत आहेत. ३४४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २६ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. ठाणे जिल्ह्यात २४ एप्रिल २०२१ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक ८३ हजार सक्रिय रुग्णसंख्या होती. त्याला २१९ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. आता तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी या संख्येच्या तीनपट म्हणजे ६५७ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्धतेसाठी नियोजन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ------------- ६७२ मेट्रिक टन ऑक्सिजनची क्षमता पीएसए प्लांट, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन साठविण्यासाठी टाक्या, सिलेंडर्स यांच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहील, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात ३१ पीएसए प्लांट प्रस्तावित असून त्यापैकी २६ प्लांटच्या माध्यमातून ४५ मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. तसेच सध्या ६७२ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा साठा करण्याची क्षमता विकसित केली असून, अजून २७० मेट्रिक टन साठवणूक क्षमता विकसित करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com