लोकल प्रवासावर बंधने घालण्याचा प्रस्ताव नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोकल प्रवासावर बंधने घालण्याचा प्रस्ताव नाही
लोकल प्रवासावर बंधने घालण्याचा प्रस्ताव नाही

लोकल प्रवासावर बंधने घालण्याचा प्रस्ताव नाही

sakal_logo
By
लोकल प्रवासावर बंधने घालण्याचा प्रस्ताव नाही सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ४ : मुंबईत सध्या तरी उपनगरीय रेल्वे सेवेवर बंधन घालण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याचे मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. मुंबईत सध्या दरदिवशी निघणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आठ हजारांवर पोहोचली आहे. पॉझिटिव्हिटी दरही वाढला आहे; मात्र मुंबई पालिका या संकटाला तोंड देण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर काम करत असल्याचे ते म्हणाले. मात्र भविष्यात बाधितांची संख्या वेगाने वाढू लागल्यास राज्य कोरोना कृती दलाशी चर्चा करून सरकार योग्य तो निर्णय घेईल. शेवटी या निर्णयाचा परिणाम संपूर्ण महामुंबईच्या प्रवाशांवर होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत सध्या ९० टक्के रुग्णांमध्ये कुठलीही लक्षणे नाहीत. केवळ चार ते पाच टक्के बाधितांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मुंबईत उपलब्ध ३०,५०० खाटांपैकी केवळ ३,५०० खाटा भरल्या आहेत. ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरच्या सुविधेसह रुग्णालये सज्ज असल्याचेही ते म्हणाले.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top