२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाशØ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाशØ
२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाशØ

२२ कोटींच्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पर्दाफाशØ

sakal_logo
By
२२ कोटींच्या बनावट `आयटीसी` रॅकेटचा पर्दाफाश ठाणे सीजीएसटी आयुक्तालयाची कारवाई, पिता-पुत्र अटकेत सकाळ वृत्तसेवा ठाणे, ता. ५ : जीएसटीच्या २२ कोटी रुपयांच्या बनावट इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) रॅकेटचा पर्दाफाश करून व्यापारी पिता-पुत्राला मुंबई विभाग ठाणे सीजीएसटी कक्षाने अटक केली आहे. सीजीएसटी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या दोघांना मंगळवारी (ता. ४) मुख्य महानगर दंडाधिकारी, मुंबई यांच्यासमोर हजर केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती ठाणे सीजीएसटी विभागाकडून देण्यात आली. सेंट्रल इंटेलिजेंस युनिट, मुंबई सीजीएसटी झोन ​​यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ठाणे सीजीएसटी विभागाने ही कारवाई केली. या दोघांचे मेसर्स शाह एंटरप्रायझेस आणि मेसर्स यूएस एंटरप्रायझेस या दोन फर्मचे कार्यालय कांदिवली पश्‍चिमेत आहे. दोन्ही कंपन्या फेरस वेस्ट आणि भंगार आदींच्या व्यापारासाठी जीएसचीमध्ये नोंदणीकृत आहेत. या फर्म अनुक्रमे ११.८० आणि १०.२३ कोटी रुपयांची बनावट आयटीसी घेऊन ते पास करण्यात गुंतल्या होत्या. तसेच सीजीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा प्राप्त न करता बनावट आयटीसी बनावट संस्थांकडून मिळवत होत्या आणि ते या इतर नेटवर्कच्या संस्थांना देत होत्या. दोघांना सीजीएसटी कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. प्रामाणिक करदात्यांशी अस्वास्थ्य स्पर्धा निर्माण करणाऱ्या आणि सरकारी तिजोरीला योग्य कर न भरून फसवणूक करणाऱ्या बनावट आयटीसी नेटवर्कचा बंदोबस्त करण्यासाठी सीजीएसटी मुंबई विभागाने कारवाई सुरू केली होती. येत्या काही दिवसांत फसवणूक करणाऱ्या आणि करचोरी करणाऱ्यांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र करणार आहोत. - राजन चौधरी, आयुक्त सीजीएसटी आणि उत्पादन शुल्क, ठाणे आयुक्तालय.
Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top