खारघर - कोपरा पुलावरील कठडा तुटल्याने पूल धोकादायक

खारघर - कोपरा पुलावरील कठडा तुटल्याने पूल धोकादायक

खारघर-कोपरा प्रवासासाठी धोकादायक पुलावरील कठडा तुटल्याने स्थानिकांकडून दुरुस्तीची मागणी खारघर, ता. ५ (बातमीदार) : खारघर-कोपरा पुलाचा कठडा तुटला असून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकाचा पुलावर वळण घेताना अपघात होऊ शकतो, त्यामुळे सिडकोने तात्काळ पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. खारघर आणि कोपरा वसाहतीच्या सीमारेषेवर असलेला जुना पूल धोकादायक असल्याने सिडकोने मागील वर्षी २५ लाख रुपये खर्च करून पूल दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. ठेकेदाराने पुलाची दुरुस्ती करताना पुलाखालील भाग दुरुस्त केला; मात्र पुलावरील दोन्ही बाजूस असलेल्या कठड्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. विशेषतः पूल दुरुस्तीच्या वेळी सिडकोचे अधिकारी पुलाची पाहणी करणे आवश्यक होते; मात्र तसे न करता पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहतुकीसाठी खुले करण्यात आले. पुलावर एका बाजूला कठडा तुटला आहे. घरकुलकडून कोपरा पूल मार्गे येताना पुलावर प्रवेश करताना अचानक भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यास वाहन ओढ्यात पडून अपघात होऊ शकतो. सिडकोने वेळीच पुलाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. याविषयी खारघर कार्यालयातील सिडकोच्या कार्यकारी अभियंत्यांकडे विचारणा केली असता, पुलावरील तुटलेल्या कठड्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोट- सिडकोने दोन वर्षांपूर्वी खारघर कोपरा पूल दुरुस्तीसाठी २५ लाख रुपये खर्च केले. हे पैसे ठेकेदाराच्या खिशात घालण्याचे काम सिडकोने केल्याचे दिसून येते. पूल दुरुस्त करताना अर्धवट काम केले आहे. सिडकोने एकही पैसा खर्च न करता सदर ठेकेदाराकडून तात्काळ तुटलेल्या पुलावरील कठडे दुरुस्त करून घ्यावेत. - गणेश बनकर, उपाध्यक्ष, मनसे, खारघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com