कोपरखैरणे मध्ये फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

कोपरखैरणे मध्ये फेरीवाल्यांवर पालिकेची कारवाई

कोपरखैरणेत फेरीवाल्यांवर कारवाई ापाच हातगाड्यांत इतर सामान जप्त वाशी, ता ५ (बातमीदार) ः कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ परिसरातील पदपथावर फेरीवाल्यांकडून करण्यात आलेल्‍या अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. पदपथ मोकळे झाल्याने पादचाऱ्यांना दिलासा मिळाला. कोपरखैरणे विभाग कार्यालयांतर्गत अनधिकृत फेरीवाले हटविण्याचे मोहीम हाती घेण्यात आली असून पालिकेने फेरीवाल्याच्या विरोधात कारवाईसाठी कंबर कसली आहे. खैरणे व बोनकोडे गावांमध्ये पदपथावर करण्यात आलेल्या अतिक्रमणामुळे चालणे जिकिरीचे झाले होते. त्यामुळे पालिकेने फेरीवाल्यावर कारवाई केली होती. आता सेक्टर परिसरातील सेक्टर १५ ते १८ या परिसरात फेरीवाल्यांवर अतिक्रमण पथकाने कारवाई केली. यावेळी ५ हातगाडी, नाशवंत भाजीपाला इतर सामान जप्त करण्यात आले. तर जप्त केलेला मुद्देमाल क्षेपणभूमी येथे जमा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे दुकानांदारानी मार्जिनल स्पेसमध्ये अतिक्रमण केले होते त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली. धडक मोहिमेसाठी ८ मजूर, २ पिकअप व्हॅन असा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. कारवाई सहाय्यक आयुक्त तथा कोपरखैरणे विभाग अधिकारी प्रशांत गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक्षक अंभियता गणेश आघाव, कनिष्ठ अभियंता (अतिक्रमण) अमित पवार, वरिष्ठ लिपिक कमलाकर पाटील, लिपिक समाधान चाळके यांनी केली. मास्क न वापरणाऱ्यांना दणका कोरोना चे रुग्ण दैनंदिन वाढत असल्यामुळे आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या आठ जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून चार हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com