कांदिवलीत स्कायवॉकचे सरकते जिने बंद

कांदिवलीत स्कायवॉकचे सरकते जिने बंद

कांदिवलीत स्कायवॉकचे सरकते जिने बंद दोन वर्षांपासून महिला, वृद्ध, रुग्णांना त्रास कांदिवली, ता. ५ (बातमीदार) ः कांदिवली पूर्वेला आकुर्ली रोड हा एकमेव मुख्य मार्ग आहे. या मार्गावर जवळपास दीड किलोमीटरचा स्कायवॉक आहे. स्कायवॉकच्या सुरुवातीला आणि शेवटी सरकता जिना आहे. मात्र दोन वर्षांपासून दोन्हीही सरकते जिने बंद असल्याने महिला, वृद्ध आणि रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. हे सरकते जिने सुरू करा, अशी मागणी प्रवाशांमध्ये जोर धरू लागली आहे. कांदिवली पूर्वेला स्थनकापासून इतर ठिकाणी जाण्यासाठी आकुर्ली रोड हा एकमेव अरुंद, मुख्यमार्ग आहे. या मार्गाच्या पदपथावर अनधिकृत भाजी विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. सायंकाळनंतर नेहमीच येथे वाहतुकीची कोंडी होते. त्यात पदपथावर अनधिकृत भाजीवाले असल्यामुळे प्रवाशांना स्कायवॉक हा एकमेव मार्ग आहे. दररोज हजारो प्रवासी स्कायवॉकचा वापर करतात. कांदिवलीत शताब्दी आणि कामगार रुग्णालय आहे. मात्र दोन्हीही बाजूला असलेले सरकते जिने बंद असल्याने महिला, वृद्ध आणि रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ... प्रवाशांच्या सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करून बांधलेले सरकते जिने नादुरुस्त झाले आहेत. नव्याने बसविण्यासाठी उपायुक्त, सहायक आयुक्त आणि संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करून योग्य निर्णय घेणार आहे. - एकनाथ हुंडारे, नगरसेवक. ... कोरोना महामारी काळात सरकते जिने बंद होते. एम अँड ई विभागाला कळवून कंपनीला दुरुस्ती करण्यास सांगितले होते. मात्र सरकते जिने दुरुस्त होणे फार खर्चिक आणि कठीण असल्याचे कळविण्यात आले आहे. पुढील प्रस्ताव पूल आणि रस्ते विभागाकडे पाठविण्यात आला आहे. भविष्यात नवीन सरकते जिने लावण्याचा प्रयत्न आहे. त्याला थोडा वेळ जाईल. - समीर सानप, दुय्यम अभियंता, परिरक्षण आर /दक्षिण ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com